First gold medal at Kolhapur center in state tournament | राज्य बालनाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर, कोल्हापूर केंद्रात सोन्याचा तुरा प्रथम

राज्य बालनाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर, कोल्हापूर केंद्रात सोन्याचा तुरा प्रथम

ठळक मुद्दे राज्य बालनाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रात सोन्याचा तुरा प्रथम सांगलीच्या द गेम, आम्ही झाड झालो नाटकेही अंतिम फेरीतलोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : सतराव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रातून गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर या सस्थेच्या सोन्याचा तुरा या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने दिली आहे.

सांगली येथील श्रीराम रामदयाळ मालू हायस्कूलच्या द गेम नाटकास द्वितिय तर सस्नेह कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ, सांगलीच्या आम्ही झाड झालो या नाटकाला तृतीय पारितोषिक जाहीर झाले आहे. या तीनही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.

कोल्हापूरात केशवराव भोसले नाट्यगृह आणि सांगलीत विष्णुदास भावे नाट्यमंदिर येथे ६ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत बालनाट्य स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत एकुण ३९ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले.

स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून कैलास पुप्पुलवाड, अमजद सय्यद, केशव भागवत यांनी काम पाहिले. सर्व पुरस्कार विजेत्यांची सांस्कृतिक कार्य संचालक बिभिषण चवरे यांनी अभिनंदन केले आहे.

प्राथमिक फेरीतील कोल्हापूर केंद्रावरील निकाल पुढीलप्रमाणे :

दिग्दर्शन : प्रथम : युवराज केळुसकर (सोन्याचा तुरा), द्वितिय : डॉ. अरुण मिरजकर (द गेम), तृतीय : उदय गोडबोले (आम्ही झाड झालो).
प्रकाश योजना : प्रथम :श्याम चव्हाण (द गेम), द्वितिय : शशांक लिमये (ग...ग... गोष्टीचा). नेपथ्य : प्रथम : बबन कुंभार (द गेम), मनोहर साबळे (रिटर्न गिफ्ट).
रंगभूषा : प्रथम : सत्यजित गुरव (प्रश्न), द्वितिय :निलिमा ग्रामोपाध्याय (द गेम).
उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक : सोहम शिराळकर (सोन्याचा तुरा) व अन्वी बालावलकर (पिल्लुची गोष्ट).
अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे : तन्वी खाडीलकर (आम्ही झ्राड झालो), अनन्या साने (नारद झाला गारद), समिक्षा सपकाळ (झेप), पूर्वा कालेकर (घुसमट), राधा गोगटे (उदाहरणार्थ),  कैवल्य मोकाशी (नारद झाला गारद), विवेक सागर (ग.ग... गोष्टीचा), सोहम आडीवरेकर (प्रश्न), ऋृषिकेश् गुदगे (सोनेरी पिंजऱ्यातील पोपट), तनिश जोश्ी (कधी न संपणारी गोष्ट).

Web Title:  First gold medal at Kolhapur center in state tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.