शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

शाळांमध्ये पहिली घंटा वाजली, कोल्हापूरातील शाळा परिसर पुन्हा गजबजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 16:44 IST

उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुटीनंतर सोमवारी शाळांमध्ये पहिली घंटा वाजली. विद्यार्थ्यांच्या चेहर्यांवर नवे दप्तर, नवा डबा, वह्या पुस्तकांची नवलाई असतांना आपल्या मित्र-मंडळींना भेटण्याची उत्सुकता होती.तर दुसरीकडे बालवाडीत पाहिल्यांदाच शाळेत पहिले पाऊल टाकत असणार्या बालकांना आई-वडिलांना काही सोडवत नव्हते. तर मुलांचे जंगी स्वागतामुळे शाळा पुन्हा एकदा गजबजल्या.

ठळक मुद्देशाळांमध्ये पहिली घंटा वाजलीकोल्हापूरातील शाळा परिसर पुन्हा गजबजला

कोल्हापूर : उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुटीनंतर सोमवारी शाळांमध्ये पहिली घंटा वाजली. विद्यार्थ्यांच्या चेहर्यांवर नवे दप्तर, नवा डबा, वह्या पुस्तकांची नवलाई असतांना आपल्या मित्र-मंडळींना भेटण्याची उत्सुकता होती.तर दुसरीकडे बालवाडीत पाहिल्यांदाच शाळेत पहिले पाऊल टाकत असणार्या बालकांना आई-वडिलांना काही सोडवत नव्हते. तर मुलांचे जंगी स्वागतामुळे शाळा पुन्हा एकदा गजबजल्या.शहरातील इंग्रजी माध्यमांच्या बहुतांश शाळांची सुरुवात झाली. आज मराठी माध्यमांच्या शाळा सुरु झाली. शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थी आणि पालकांची धावपळ पुन्हा एकदा सुरु झाली. सकाळीच नऊवाजल्या पासून अनेक मुलांना गणवेशात तयार होऊन बसले होते. मुलांच्या शाळा सुरु झाल्याने कुटुंबातील काही सदस्यांचे पुन्हा वेळापत्रक बदलले. काही पालकांनी मुलांना शाळेत सोडण्यासाठी गर्दी केली. रिक्षावाले मामांच्या रिक्षाचा व्हॉर्न पुन्हा एकदा गल्ली, कॉलनीत सकाळ पासून वाजत होते.पहिल्याच दिवशी काहींच्या चेहरयावर उत्साह होता तर काही विद्यार्थी कंटाळवाणे होते. शाळेत गेल्यानंतर मात्र विद्यार्थी मित्र कंपनीत रमले. गळा भेट सुट्टीची मज्जा एकमेकांना सांगत होते. शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्याच्या दृष्टीने शाळांनी जय्यत तयारी केली होती. बहुतांश शाळा परिसरात सुटी संपण्याआधीच स्वच्छता अभियान राबवत वर्ग, आवार चकाचक करण्यात आले.

विद्यार्थ्यांचे स्वागत रांगोळी आणि औक्षणाने करण्यात आले. मुलांना शाळेचे वातावरण अल्हाददायक वाटावे यासाठी त्यांच्या आवडीच्या कार्टून मंडळींना खास आवतन देण्यात आले होते. ध्वनीवर्धकावर देशभक्तीपर गीते वाजविण्यात आली. प्रवेशद्वारावर फुलांसह आंब्यांच्या पानांचे बांधलेले तोरण आणि विद्यार्थ्यांचे औंक्षण तर कुठे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. अशा उत्साही वातावरणात सोमवारी शहर परिसरातील शाळेमध्ये दिसून आला. पहिल्याच दिवशी शाळेत विद्यार्थ्यांची संख्या रोडावली होती,सुट्टीनंतर बालचमूंनी शाळेच्या पहिल्याच दिवशी जाण्याचा कंटाळा केला. बालवाडी पासून ते चौथीच्या वर्गांपर्यंत संख्या कमी राहिली. 

 

टॅग्स :Schoolशाळाkolhapurकोल्हापूर