शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: गणेशोत्सवातील महाप्रसादावेळी गोळीबार, हाणामारीत पाचजण जखमी, १० जण अटकेत

By तानाजी पोवार | Updated: September 3, 2022 19:54 IST

गोळीबार झाल्याने गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

म्हालसवडे : करवीर तालुक्यातील मांडरे  येथे गणेशोत्सवानिमित्त महाप्रसादा दरम्यान जेवणाच्या पंक्तीत मानाने पाणी सोडण्याच्या कारणावरून जोरदार  हाणामारी झाली. यावेळी एकाने गोळीबार देखील केल्याने गावात एकच खळबळ उडाली. दरम्यान, काठय़ा आणि दगडाने झालेल्या हाणामारीत पाच जण जखमी झाले. उदय  पाटील, संग्राम पाटील, रंगराव पाटील, अनिल पाटील व रोहित पाटील अशी जखमींची नावे आहेत.याप्रकरणी गोळीबार करणाऱ्या अभिजित सुरेश पाटील यांच्यासह बारा जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर १० जणांना अटक करण्यात आली आहे. गोळीबार झाल्याने गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मांडरे येथील हनुमान तरुण मंडळाने काल, शुक्रवार (दि.२) रोजी सायंकाळी गणेशोत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन केले होते. येथील रीतिरिवाजानुसार महाप्रसादाच्या वाटपावेळी अगरबत्ती लावून, पंक्तीत हातावरून पाणी सोडून जेवणाची सुरुवात केली जाते. यावेळी पाणी सोडण्याच्या  मानापमानातून मंडळातीलच दोन गटात हाणामारी झाली. यात उदय  पाटील, संग्राम पाटील, रंगराव पाटील, अनिल पाटील व रोहित पाटील जखमी झाले.संशयित आरोपी अभिजीत पाटील याने बंदुकीचा परवाना नसताना फिर्यादी उदय पाटील यांच्यावर बारा बोअरच्या बंदुकीने जिवे मारण्याच्या उद्देशाने गोळी झाडली. उदय पाटील हे बाजूला झाल्याने त्यांना गोळी लागली नाही. याबाबत उदय सोनबा पाटील यांनी आज, शनिवारी करवीर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.  याप्रकरणी अभिजीत सुरेश पाटील, समीर कृष्णात पाटील, सुरेश रामचंद्र पाटील, बाजीराव पांडुरंग पाटील, विशाल बाजीराव पाटील, विकास बाजीराव पाटील, दादासो श्रीपती पाटील, प्रकाश शंकर भावके, सर्जेराव शंकर भावके, स्वरूप सुरेश पाटील, राहुल कृष्णात पाटील व तुषार राजाराम पाटील (सर्व रा. मांडरे)  यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन करवीरच्या पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली असून सहायक फौजदार निवास पवार  व प्रशांत पाटील यांच्यासहित गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीFiringगोळीबारPoliceपोलिसGanesh Mahotsavगणेशोत्सव