आजरा : मध्यरात्री लागलेल्या अग्नितांडवाने आजरा शहर हादरले. या आगीत ८ दुकानगाळे व चारचाकी दुरुस्तीच्या गॅरेजमधील ९ वाहनांसह साहित्य जळून खाक झाले. प्राथमिक अंदाजानुसार ४ कोटी रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.आगीत प्लंबिंग साहित्याचे अरकाम ट्रेडर्स, ऑईल,मशीन टूल्स व दुचाकीचे मटेरियल विक्रीचे शहाबाद ऑटो गॅरेज, रेड ड्रॅगन चायनीज सेंटर, मनाली एग्ज सेंटर, मंतेशा टायर्स, संतोष बॅटरीज, दळवी इलेक्ट्रिकल्स, पंचतारा हॉटेल व भाई भाई कोल्ड्रिंक्स, चार चाकी दुरुस्तीचे कारझोन सेंटरमधील ९ चारचाकी, कलर मशीन, कार रिपेअर मशीन, एअर कॉम्प्रेसर, स्पेअरपार्ट जळून खाक झाले आहेत.
सकाळपर्यंत आग विझवण्याचे सुरु होते काममध्यरात्री लागलेली आग सकाळी ८ वाजेपर्यंत विझविण्याचे काम सुरू होते. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटने आग लागल्याचे समजते. दुकानगाळ्यांना लागलेली आग पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
Web Summary : A devastating fire in Ajra, Kolhapur, destroyed eight shops and nine vehicles. The blaze, suspected to be caused by a short circuit, resulted in an estimated loss of ₹4 crore. Firefighting efforts continued until morning. No casualties were reported.
Web Summary : कोल्हापुर के आजरा में भीषण आग लगने से आठ दुकानें और नौ वाहन जलकर खाक हो गए। शॉर्ट सर्किट से लगी आग में करीब 4 करोड़ रुपये का नुकसान हुआ। आग बुझाने का काम सुबह तक जारी रहा। कोई हताहत नहीं।