मोरेवाडी येथे गवताच्या गंजीस आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:23 IST2021-03-24T04:23:20+5:302021-03-24T04:23:20+5:30
मोरेवाडी येथे मोकळ्या जागेत सात शेतकऱ्यांनी १४ गवताच्या आणि कडब्याच्या गंजी रचून ठेवल्या होत्या. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास अचानक ...

मोरेवाडी येथे गवताच्या गंजीस आग
मोरेवाडी येथे मोकळ्या जागेत सात शेतकऱ्यांनी १४ गवताच्या आणि कडब्याच्या गंजी रचून ठेवल्या होत्या. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास अचानक या गवताच्या गंजींनी पेट घेतला. जवळ जवळ असणाऱ्या १४ गंजी जळून भस्मसात झाल्या. महनगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी येऊन ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. काही काळासाठी आग आटोक्यात आली, मात्र पुन्हा वाऱ्यामुळे आग सर्वत्र पसरली आणि गवताच्या सर्व गंजींची राख झाली. आक्काताई वेताळ, महेश सुदाम मोरे, हिंदुराव पाटील, पांडुरंग यादव, कस्पटे, प्रकाश मोरे, संतोष रांगोळे यांच्या या गंजी होत्या.
काही दिवसांपूर्वीच शेंडा पार्क येथे लागलेल्या आगीत गवत व सुमारे २० हजार झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती . शेंडा पार्कमधील आगीमुळे मोरेवाडी ग्रामस्थांना तेथील मिळणारे गवतही नष्ट झाले होते. यामुळे मोरेवाडी येथील जनावरांना कोणता चारा द्यायचा, हा प्रश्न पडला आहे.
२३ मोरेवाडी फायर
फोटो ओळ :
मोरेवाडी (ता. करवीर) येथे गवताच्या गंजींना आग लागल्याने आगीने असे रौद्ररूप धारण केले होते.