शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: राज्यात मतदानाला सुरुवात, मतदारांची केंद्रांवर गर्दी
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

अग्निशमनच्या गाडीला रस्ता दिसेना! कुरुंदवाडमध्ये वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 11:39 PM

शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्तच राहिली नाही. यावर कोणाचेच नियंत्रण राहिले नाही. शहरातील प्रमुख चौक, कार्यालय, पोलीस ठाण्याबरोबर वाहतूक कोंडीचा सामना अत्यावश्यक सेवा असलेल्या अग्निशमन विभागालाही बसत

गणपती कोळी ।कुरुंदवाड : शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्तच राहिली नाही. यावर कोणाचेच नियंत्रण राहिले नाही. शहरातील प्रमुख चौक, कार्यालय, पोलीस ठाण्याबरोबर वाहतूक कोंडीचा सामना अत्यावश्यक सेवा असलेल्या अग्निशमन विभागालाही बसत आहे. येथील दौलतशहावली मार्केटमध्ये असणाऱ्या अग्निशमन कार्यालयासमोर दररोज दोन चाकी, चारचाकी वाहने अस्ताव्यस्त पद्धतीने लावून वाहतुकीची कोंडी केली जाते. याचे गांभीर्य कोणालाच राहिले नाही. यामुळे अग्निशमन विभागाची तरी वाहतुकीच्या कोंडीतून सुटका करावी, अशी मागणी होत आहे.

येथील दौलतशहावली मार्केटमध्ये अग्निशमन कार्यालय आहे. एखादी आगीची दुर्घटना घडल्यास त्वरित पोहोचता यावे, यासाठी अग्निशमन गाडी पाणी भरून सज्ज असते. शिवाय या कार्यालयाकडे चोवीस तास सेवा देणारे फायरमन व ड्रायव्हर असा सात कर्मचाºयांचा जागता पहारा आहे.

या मार्केटमध्ये दररोज भाजीपाला, फळभरणी सौदा होतो. त्यासाठी सांगली, कोल्हापूरहून कर्नाटकातील शेतकरी, व्यापारी शेतीमाल विक्रीसाठी व खरेदीसाठी येत असतात. दुपारपर्यंत सौदा सुरू असल्याने या परिसरात दोनचाकी, चारचाकी वाहनांची गर्दी असते.

अग्निशमन कार्यालय ते मुख्य रस्ता या मार्गात वाहनांसाठी नो पार्किंग आहे. मात्र, व्यापारी, व्यावसायिक, वाहनचालक नो पार्किंग नियमांचे पालनच करीत नाहीत. शिवाय या गंभीर समस्येकडे ना पालिकेचे, ना पोलीस ठाण्याचे लक्ष आहे. निर्ढावलेले वाहनचालक अग्निशमन कर्मचाºयांच्या विरोधाला दादच देत नाहीत. त्यामुळे ही अत्यावश्यक सेवाही वाहतुकीच्या कोंडीत अडकली आहे.कृत्रिम समस्यांची दृष्टअग्निशमन विभागाच्या उत्कृष्ट व तत्पर सेवेमुळे पालिकेचा हा अग्निशमन विभाग जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांच्या अव्वलस्थानी आहे. मात्र, त्यांच्या या कर्तृत्वाला कृत्रिम समस्यांची दृष्ट लागत आहे.अडचणीची जागा : पालिकेने अग्निशमन विभागाच्या माळभागातील औद्योगिक वसाहतीत अग्निशमन गाडी थांबण्याची इमारतही बांधली आहे. मात्र, कर्मचाºयांचे निवासस्थान नसल्याने कार्यालय दौलतशहावली मार्केटमधून हलविले नाही. या मार्केटमधील अडचणीच्या जागेमुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवणारच आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने कार्यालय औद्योगिक वसाहतीत हलविणे सोयीचे ठरणार आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीkolhapurकोल्हापूर