कोल्हापूर : लक्ष्मीपुरी येथील रिलायन्स मॉलच्या शेजारी दलाल मार्केट रोडवरील फळांच्या गोदामाला रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास आग लागून सुमारे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले. आगीत फळे आणि रिकामी खोकी जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग मोठ्या प्रमाणात पसरायच्या आतच नियंत्रणात आली.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्स मॉललगतच्या दलाल मार्केट रोडवर शाहरुख बागवान यांचे फळांचे गोडाऊन आहे. रविवारी रात्री नऊच्या सुमारास ते गोडाऊन बंद करून घरी गेले होते. रात्री अकराच्या सुमारास गोडाऊनमधून धूर येत असल्याचे परिसरातील रहिवासी मिलिंद दिघे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. तसेच परिसरातील नागरिकांना एकत्र करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ताराराणी अग्निशमन केंद्र आणि प्रतिभानगर अग्निशमन केंद्राचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अवघ्या पंधरा मिनिटांत ही आग आटोक्यात आणली. प्राथमिक अंदाजानुसार फटाक्यांच्या ठिणगीमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही आग वेळेत नियंत्रणात आल्याने मोठी हानी टळली.
Web Summary : A fire broke out at a fruit warehouse in Kolhapur due to suspected fireworks. Fruits and empty crates were destroyed, causing ₹15,000 loss. Firefighters quickly controlled the blaze, preventing further damage.
Web Summary : कोल्हापुर के एक फल गोदाम में पटाखों के कारण आग लग गई। फलों और खाली पेटियों का नुकसान हुआ, जिससे ₹15,000 का नुकसान हुआ। दमकल कर्मियों ने आग पर काबू पाया, जिससे बड़ा नुकसान टल गया।