कोरोना नियमांचे उल्लंघनप्रकरणी अडीच लाख रुपये दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:21 IST2021-04-26T04:21:48+5:302021-04-26T04:21:48+5:30

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुकारलेल्या ‘ब्रेक द चेन’च्या अंमलबजावणीसाठी कोल्हापूर पोलीस दलाने जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या नाकाबंदीत निर्बंधांचे ...

A fine of Rs 2.5 lakh was levied for violating the Corona rules | कोरोना नियमांचे उल्लंघनप्रकरणी अडीच लाख रुपये दंड वसूल

कोरोना नियमांचे उल्लंघनप्रकरणी अडीच लाख रुपये दंड वसूल

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुकारलेल्या ‘ब्रेक द चेन’च्या अंमलबजावणीसाठी कोल्हापूर पोलीस दलाने जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या नाकाबंदीत निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून रविवारी सुमारे अडीच लाख रुपये दंड वसूल केला. यामध्ये तब्बल १६५ वाहनांवर जप्तीची कारवाई केली.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना काही निर्बंध घातले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यासाठी पोलीस दलाने गेला आठवडाभर कडक निर्बंध घातले आहेत. रविवारी जिल्ह्यात केलेल्या नाकाबंदीदरम्यान विनामास्क फिरणाऱ्या २७९ जणांवर दंडात्मक कारवाई करत ६३ हजार ७०० रुपये दंड वसूल केला. त्याशिवाय विनाकारण घराबाहेर पडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १५५४ वाहनांवर दंडात्मक कारवाई करून सुमारे एक लाख ८९ हजार ७०० रुपये दंड वसूल केला. याशिवाय १६५ दुचाकी जप्त करण्यात आल्या.

Web Title: A fine of Rs 2.5 lakh was levied for violating the Corona rules