अकरानंतर दुकाने सुरू ठेवणाऱ्यांकडून १७ हजारांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:22 IST2021-04-25T04:22:45+5:302021-04-25T04:22:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : संचारबंदीमुळे सकाळी ११ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. तरीसुद्धा यानंतर सुरू ठेवून नियम ...

अकरानंतर दुकाने सुरू ठेवणाऱ्यांकडून १७ हजारांचा दंड वसूल
लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : संचारबंदीमुळे सकाळी ११ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. तरीसुद्धा यानंतर सुरू ठेवून नियम भंग केल्याबद्दल पाच दुकानदारानंसह मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या १६ जणांवर कारवाई करीत १७ हजारांचा दंड वसूल केला. ही कारवाई केएमटी व पोलिसांच्या पथकाने शनिवारी सकाळी केली.
शहरामध्ये शासनाच्या आदेशानुसार सकाळी ११ नंतर औषधे दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे शासनाची आदेश आहेत. तरीसुद्धा संभाजीनगर येथील चिंतामणी ऑइल डेपो, आदर्श चिकन सेंटर व बसंत बहार टॉकीज येथील टेक्सास सलून दुकानदारांनी नियमाचा भंग केला. याबद्दल या दुकानदारांकडून प्रत्येकी १ हजार, तर साने गुरुजीतील पुष्कर वाईन्स या दुकानदाराकडून ५ हजार रुपयांचा रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यासोबतच सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या १६ जणांवर कारवाई करीत ८ हजार रुपये असे एकूण १७ हजार रुपये वसूल करण्यात आले.