शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध कलावंतांची परवड...

By admin | Updated: December 9, 2014 00:26 IST

मानधन थकले : कलाकार संघ आज देणार निवेदन

कोल्हापूर : गेल्या सात महिन्यांपासून मानधन थकल्याने वृद्ध कलावंतांची परवड होत आहे. जिल्ह्यात १ हजार १११ वृद्ध कलाकार मानधनास पात्र आहेत. मानधनासाठी त्यांचे जिल्हा परिषदेमध्ये हेलपाटे सुरू आहेत. थकीत मानधनासह विविध प्रलंबित प्रश्नांसाठी कोल्हापूर जिल्हा लोककलाकार संघातर्फे उद्या, मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे.लोककला, तमाशा, शाहिरी, नाट्य व चित्रपट, भजन, कीर्तन, नृत्य, संगीत या क्षेत्रांतील कलावंतांना शासनाकडून मानधन दिले जाते. तालुकास्तरावरील लाभार्थी कलावंतांना महिन्याला १००० रुपये, राज्यस्तरावरील कलावंताला १२०० रुपये, चित्रपट क्षेत्रातील कलावंताला १४०० रुपये असे मानधन शासनाकडून दिले जाते. वर्षातून दोनवेळा हे मानधन शासनाकडून दिले जाते. शासनाने मार्च ते जूनपर्यंतचे ३४ लाख ९६ हजार इतके मानधन शासनाकडून कलावंतांना दिले आहे. पण, जून ते डिसेंबरपर्यंतचे मानधन त्यांना मिळालेले नाही. त्यासाठी कलावंतांचे जिल्हा परिषदेमध्ये हेलपाटे सुरू आहेत. थकीत वेतनासह विमा, घरकुल आणि आरोग्य योजना, ओळखपत्र देणे असे विविध प्रश्न प्रलंबित असल्याचे लोककलाकार संघाचे अध्यक्ष विलास पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, संघाकडून साडेचार हजार कलाकारांची नोंदणी आहे. त्यापैकी १ हजार १११ कलावंत मानधनासाठी पात्र आहेत. मात्र, त्यांना अनियमित मानधन मिळते. ते वेळेवर मिळावे तसेच प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी उद्या, जिल्हाधिकारी राजाराम माने यांना निवेदन देणार आहे. (प्रतिनिधी)