केएमटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पर्यायांचा शोधक
By Admin | Updated: August 24, 2014 00:48 IST2014-08-24T00:48:21+5:302014-08-24T00:48:34+5:30
एक कोटी देणार

केएमटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पर्यायांचा शोधक
ोल्हापूर : प्रवाशांची सेवा करता-करता एक हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांच्या संसाराचा गाडा वाहणाऱ्या ‘केएमटी’ला सुरळीत मार्गावर आणण्याचे प्रयत्न पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी पातळीवर सुरू झाले आहेत. केएमटीचा रोजचा तोटा भरून काढून कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर कसे होतील, यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जाणार आहेत. दरम्यान, आज, शनिवारी संयुक्त बैठकीत कर्मचाऱ्यांचे पगार भागविण्यासाठी पर्यायांचा शोध घेण्यात आला; तथापि आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या मान्यतेनंतरच त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
केएमटीला दिवसागणिक सव्वादोन लाखांचा तोटा होत आहे. गेल्या काही महिन्यांतील हा संचित तोटा सहा कोटींच्या घरात जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे त्याची टाच थेट कर्मचाऱ्यांच्या पगारावर आली. दोन महिन्यांचे पगार थकले. तरीही कर्मचाऱ्यांनी काम सुरू ठेवले. परंतु केएमटीबाह्य व्यक्तींचे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळत असल्याने कर्मचाऱ्यात अस्वस्थता झाली. त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे.
आज, शनिवारी दुपारी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण, परिवहन सभापती वसंत कोगेकर, उपायुक्त अश्विनी वाघमळे, सहायक आयुक्त उमेश भोसले, केएमटीचे व्यवस्थापक संजय भोसले यांची संयुक्तपणे बैठक झाली. बैठकीत कर्मचाऱ्यांच्या पगारावर चर्चा झाली. सध्याची परिस्थिती पाहता पगार व डिझेलची उसनवारी भागविण्याकरिता महानगरपालिकेने एक कोटीचा निधी द्यावा किंवा तेवढे कर्ज घेणे या पर्यायांवर चर्चा झाली; परंतु आयुक्तांच्या मान्यतेशिवाय निर्णय घेणे अशक्य होते. (प्रतिनिधी)
पूर्ण वेळ देणाऱ्या व्यवस्थापकाची गरज : पसारे
केएमटी प्रशासन व्यवस्थित चालविण्यासाठी केएमटीला सध्या पूर्ण वेळ व्यवस्थापकाची गरज आहे, असे परिवहन समितीचे माजी सभापती राजू पसारे यांनी म्हटले आहे. केएमटीची घडी नीट बसविण्याकरिता निष्काळजी अधिकाऱ्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर बदल्या कराव्यात, असेही त्यांनी म्हटले आहे. याबाबत प्रसिद्धी पत्रकात पसारे यांनी म्हटले आहे की, केएमटीमध्ये २० एटीआय असून ते आपल्या कामाची जबाबदारी किती योग्य प्रकारे पार पाडतात, याची चौकशी झाली पाहिजे. कर्मचाऱ्यांची भरती व कायम करण्यासाठी पैसे घेणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी व्हावी.
एक कोटी देणार
के.एम. टी. कर्मचाऱ्यांचे पगार व अनुषंगिक देणी भागविण्यासाठी एक कोटी रुपयांची मदत महानगरपालिकेतर्फे देण्याचा निर्णय रात्री उशिरा आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला.
आशादायक चित्र
४गृहखात्याकडून अनुदान येणे रक्कम : चार कोटी.
४शासनाकडून येणारे अनुदान लवकरच मिळण्याची शक्यता.
४मंत्री भास्कर जाधव यांनी घोषित केलेले अनुदान येणे : २ कोटी.
४एक महिन्याचा पगार नंतर घेण्याची कर्मचाऱ्यांची तयारी.
४गृहखाते व मंत्री जाधव यांचे अनुदान आल्यास केएमटी पूर्वपदावर.
विदारक चित्र
४दररोजचा तोटा सरासरी
२ लाख २५ हजार रुपये.
४महिन्याचा सरासरी तोटा
६७ लाख ५० हजार रुपये.
४दररोजचे उत्पन्न सरासरी
९ लाख रुपये.
४महिन्याचे सरासरी उत्पन्न
२ कोटी ७० लाख.
४कर्मचाऱ्यांचा महिन्याला पगार
१ कोटी ५० लाख.
४डिझेल, टायर व आनुषंगिक खर्च २ कोटी ५० लाख.
४केएमटीबाह्य शक्तीचा हस्तक्षेप वाढला आहे.