नृसिंहवाडीत आशा स्वयंसेविकांना आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:19 IST2021-05-29T04:19:00+5:302021-05-29T04:19:00+5:30

नृसिंहवाडी : नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील आशा स्वयंसेविकांचा सन्मान करण्यात आला. कोरोना काळात प्रामाणिकपणे सेवा बजावल्याबद्दल येथील गुरुमोल परिवार, ...

Financial assistance to Asha volunteers in Nrusinhwadi | नृसिंहवाडीत आशा स्वयंसेविकांना आर्थिक मदत

नृसिंहवाडीत आशा स्वयंसेविकांना आर्थिक मदत

नृसिंहवाडी : नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील आशा स्वयंसेविकांचा सन्मान करण्यात आला. कोरोना काळात प्रामाणिकपणे सेवा बजावल्याबद्दल येथील गुरुमोल परिवार, श्री साईनाथ पतसंस्था, ब्राह्मण परिवार महाअधिवेशन यांच्यातर्फे त्यांना आर्थिक मदत देण्यात आली.

कोरोना काळात आशा स्वयंसेविकांनी घरोघरी जाऊन ग्रामस्थांची तपासणी, कोरोना रुग्णांची नोंद घेणे यासह मार्गदर्शन करुन आपले कर्तव्य बजावले आहे. या कामाची दखल घेऊन त्यांना ‘एक हात मदतीचा’ या संकल्पनेतून आर्थिक स्वरुपात मदत देण्यात आली. आशा सेविका लता कुन्नुरे, स्मिता शिंदे, वैशाली चव्हाण आणि सविता शिंदे यांना ही मदत देण्यात आली. यावेळी अमोल पुजारी, अविनाश शिंदे, गुरुप्रसाद रिसबूड, गुरूदास खोचरे, शिवराज जाधव, पुंडलिक शिरोटे, विकास कदम, तुषार खोंबारे उपस्थित होते.

फोटो - २८०५२०२१-जेएवाय-०३

फोटो ओळ - नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे आशा स्वयंसेविकांचा सन्मान करण्यात आला.

Web Title: Financial assistance to Asha volunteers in Nrusinhwadi