शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर जुना बुधवार पेठ येथील १०० वर्षांपूर्वीची ती झाडे तोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 13:55 IST

या संदर्भात संबंधित झाडांवर नोटीस चिकटवून हरकती मागविण्यात आल्या होत्या. समितीकडे ३० डिसेंबर २०१९ रोजी नऊ लेखी हरकती आल्या. यातील १०० वर्षांपूर्वीची दोन जुनी, उलट्या अशोकाची झाडे तोडण्याला वृक्षप्रेमींचा विरोध होता. आयुक्तांनी या संदर्भात २१ जानेवारी रोजी ताराराणी गार्डन येथील निवडणूक शाखा कार्यालयात सुनावणी घेतली.

ठळक मुद्दे: सुनावणीतील मुद्दे आयुक्तांच्या आदेशाने निकालीकोल्हापूर महापालिकेने घेतला निर्णय

कोल्हापूर : जुना बुधवार पेठ येथे पोलीस निवासस्थानांच्या बांधकामासाठी अडथळा ठरणारी दोन झाडे अखेर महानगरपालिकेच्या प्रशासनाने बुधवारी जेसीबीद्वारे तोडून टाकली. याबाबत कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी घेतलेल्या सुनावणीतील मुद्दे निकालात काढले. या निर्णयामुळे पोलिसांसाठी घरे बांधण्याचा मार्ग मोकळा झाला.

जुना बुधवार पेठ परिसरातील सि. स. नं. २९३५ अ, सी वॉर्ड या जागेत पोलिसांसाठी १९२ घरे बांधण्याचा प्रस्ताव आहे. या बांधकामाच्या ठिकाणी एकूण ९७ झाडे आहेत. त्यांपैकी बांधकामाला अडथळा ठरत असलेली कॅशियाची दोन, अशोकाची तीन, पिंपळाचे एक तसेच बदामाचे एक अशी सात झाडे तोडण्याची परवानगी पोलीस प्रशासनाकडून महापालिकेचे आयुक्त आणि वृक्ष प्राधिकरण समितीकडे मागण्यात आली होती. या संदर्भात संबंधित झाडांवर नोटीस चिकटवून हरकती मागविण्यात आल्या होत्या. समितीकडे ३० डिसेंबर २०१९ रोजी नऊ लेखी हरकती आल्या. यातील १०० वर्षांपूर्वीची दोन जुनी, उलट्या अशोकाची झाडे तोडण्याला वृक्षप्रेमींचा विरोध होता. आयुक्तांनी या संदर्भात २१ जानेवारी रोजी ताराराणी गार्डन येथील निवडणूक शाखा कार्यालयात सुनावणी घेतली.

या सभेत वृक्षप्रेमींच्या वतीने कलाशिक्षक मिलिंद यादव, शिवप्रभा लाड आणि पक्षिमित्र सतपाल गंगलमाले यांनी आपली मते मांडली आणि पुरावे सादर केले; तर पोलिसांकडून अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे आणि आर्किटेक्ट गिरिजा कुलकर्णी यांनी आपली मते मांडली. पाच हरकतदार उपस्थित न राहिल्याने त्यांचे अर्ज निकाली काढण्यात आले. यात आठ मुद्द्यांवर चर्चा झाली आणि अडथळा ठरणारी झाडे ही कोणत्याही प्रकारची परिसंस्था तयार करीत नाहीत; त्यामुळे स्थानिक प्राणी व वनस्पती यांचे जीवनचक्र खंडित होत नाही अथवा बिघडत नाही; त्यामुळे हरकतदारांचे सर्व मुद्दे निकाली काढण्याचा आदेश आयुक्तांनी दिल्यानंतर या परिसरातील सर्व झाडे जेसीबीद्वारे तोडण्यात आली. कोल्हापुरातील जुना बुधवार पेठ येथे पोलीस निवासस्थानांच्या बांधकामासाठी अडथळा ठरणारी दोन झाडेअखेर महानगरपालिकेच्या प्रशासनाने बुधवारी जेसीबीद्वारे तोडून टाकली.(- संदीप आडनाईक)

 

 

अखेर जुना बुधवार पेठ येथील १०० वर्षांपूर्वीची ती झाडे तोडलीमहापालिकेने घेतला निर्णय : सुनावणीतील मुद्दे आयुक्तांच्या आदेशाने निकालीलोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जुना बुधवार पेठ येथे पोलीस निवासस्थानांच्या बांधकामासाठी अडथळा ठरणारी दोन झाडे अखेर महानगरपालिकेच्या प्रशासनाने बुधवारी जेसीबीद्वारे तोडून टाकली. याबाबत कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी घेतलेल्या सुनावणीतील मुद्दे निकालात काढले. या निर्णयामुळे पोलिसांसाठी घरे बांधण्याचा मार्ग मोकळा झाला.जुना बुधवार पेठ परिसरातील सि. स. नं. २९३५ अ, सी वॉर्ड या जागेत पोलिसांसाठी १९२ घरे बांधण्याचा प्रस्ताव आहे. या बांधकामाच्या ठिकाणी एकूण ९७ झाडे आहेत. त्यांपैकी बांधकामाला अडथळा ठरत असलेली कॅशियाची दोन, अशोकाची तीन, पिंपळाचे एक तसेच बदामाचे एक अशी सात झाडे तोडण्याची परवानगी पोलीस प्रशासनाकडून महापालिकेचे आयुक्त आणि वृक्ष प्राधिकरण समितीकडे मागण्यात आली होती. या संदर्भात संबंधित झाडांवर नोटीस चिकटवून हरकती मागविण्यात आल्या होत्या. समितीकडे ३० डिसेंबर २०१९ रोजी नऊ लेखी हरकती आल्या. यातील १०० वर्षांपूर्वीची दोन जुनी, उलट्या अशोकाची झाडे तोडण्याला वृक्षप्रेमींचा विरोध होता. आयुक्तांनी या संदर्भात २१ जानेवारी रोजी ताराराणी गार्डन येथील निवडणूक शाखा कार्यालयात सुनावणी घेतली.या सभेत वृक्षप्रेमींच्या वतीने कलाशिक्षक मिलिंद यादव, शिवप्रभा लाड आणि पक्षिमित्र सतपाल गंगलमाले यांनी आपली मते मांडली आणि पुरावे सादर केले; तर पोलिसांकडून अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे आणि आर्किटेक्ट गिरिजा कुलकर्णी यांनी आपली मते मांडली. पाच हरकतदार उपस्थित न राहिल्याने त्यांचे अर्ज निकाली काढण्यात आले. यात आठ मुद्द्यांवर चर्चा झाली आणि अडथळा ठरणारी झाडे ही कोणत्याही प्रकारची परिसंस्था तयार करीत नाहीत; त्यामुळे स्थानिक प्राणी व वनस्पती यांचे जीवनचक्र खंडित होत नाही अथवा बिघडत नाही; त्यामुळे हरकतदारांचे सर्व मुद्दे निकाली काढण्याचा आदेश आयुक्तांनी दिल्यानंतर या परिसरातील सर्व झाडे जेसीबीद्वारे तोडण्यात आली.

 

कोल्हापुरातील जुना बुधवार पेठ येथे पोलीस निवासस्थानांच्या बांधकामासाठी अडथळा ठरणारी दोन झाडेअखेर महानगरपालिकेच्या प्रशासनाने बुधवारी जेसीबीद्वारे तोडून टाकली. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिकाcommissionerआयुक्त