शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठांतील भरतीचा मार्ग मोकळा

By admin | Updated: November 29, 2014 00:29 IST

राज्यपालांचा हिरवा कंदील : प्रक्रियेला गती येणार

शिवाजी गोरे -दापोली --राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या हिताचे परिनियम रखडल्याने गेले चार वर्षे भरती प्रक्रिया ठप्प होती. या भरती प्रक्रियेचा मार्ग राज्याचे नवनियुक्त राज्यपाल विद्यासागर राव यांनी मोकळा केला असून, सुधारित परिनियमाला मंजुरी दिली आहे. राज्याच्या कृषी धोरणाला गती देण्यासाठी चार कृषी विद्यापीठांची स्थापना करण्यात आली आहे. विद्यापीठांतील सर्व नोकर भरतीचे अधिकार निवड मंडळाने आपल्याकडे राखून ठेवले होते. या निवड मंडळाचे अध्यक्ष राज्याचे कृषिमंत्री असावेत, असाही कायदा करण्यात आला होता; मात्र या निवड मंडळावरच चारही कृषी विद्यापीठांनी आक्षेप घेतला. निवड मंडळाने काही शिक्षकेतर पदे भरण्यासाठी जाहिरातही काढली होती; परंतु या भरतीला न्यायालयानेच स्थगिती दिली. राज्यपाल विद्यासागर राव यांनी चारही कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंचे म्हणणे ऐकून घेतले गेले.कृषी विद्यापीठांची स्वाय्यता कमी करण्यात येऊ नये, अधिकारच नसेल तर कुलगुरूपद रद्द करा. अशी भूमिका चारही कृषी विद्यापीठातील कुलगुरूंनी घेतली. त्याची दखल घेत राज्यपालांनी विद्यापीठाची स्वायतता टिकवून ठेवण्याचा निर्णय घेतला.परिनियमात बदल करून प्राध्यापक व त्यावरील पदे निवड मंडळामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आला . वर्ग २, वर्ग ३, वर्ग ४ ही सर्व पदे विद्यापीठ स्तरांवर निवड समितीमार्फत भरण्याचा निर्णय झाला. कृषी विद्यापीठांना सहाव्या वेतन आयोगाच्या अटीनुसार शैक्षणिक पात्रता असावी असे निश्चित करण्यात आले.पदे भरतीतील मुख्य अडसर दूर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, या चारही कृषी विद्यापीठांत शिक्षकवर्गीय ४० टक्केपदे रिक्त होती. ही पदे भरण्यातील मुख्य अडसर दूर झाल्याने लवकरच या पदाची भरती प्रक्रिया सुरू होईल.४चार वर्षे भरती प्रक्रिया रखडल्याने शिक्षण, संशोधन, विस्तार या कामांत अडसर निर्माण झाली होती. तसेच पदोन्नती न झाल्यानेसुद्धा अनेकांचे नुकसान झाले आहे आणि कुलगुरू पदासाठी लागणारा एकही पात्र उमेदवार राज्यातील विद्यापीठांत नाही. त्यामुळे चार वर्षांत राज्याचेही नुकसान झाले आहे.