शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

उमेदवारांचा फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:43 AM

संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत यावर्षी सोशल मीडियावरील प्रचाराचे महत्त्व वाढले आहे. कोल्हापूर आणि ...

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत यावर्षी सोशल मीडियावरील प्रचाराचे महत्त्व वाढले आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघांतील उमेदवारांचा ‘सोशल’ प्रचारात फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपवर भर असल्याचे दिसत आहे. मात्र, सहा उमेदवार हे प्रचाराच्या या पद्धतीपासून दूर आहेत.या उमेदवारांनी निवडणूक विभागाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीतून हे चित्र समोर आले आहे. दोन्ही मतदारसंघांत ३२ उमेदवार रिंगणात आहेत. जाहीर सभा, मेळावे, प्रचारफेरी, पदयात्रांबरोबर सोशल मीडियावर प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. अपेक्षित व्यक्ती, गटापर्यंत भूमिका थेटपणे पोहोचविण्यासाठी उमेदवारांनी प्रचारयंत्रणेत सोशल मीडियाचा समावेश केला आहे. ही यंत्रणा सांभाळण्यासाठी काहींनी स्वतंत्र पथक (टीम) नेमले आहे. प्रचारात फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यूट्यूब यांचा वापर केला जात आहे. या मीडियाच्या माध्यमातून कोल्हापूर मतदारसंघातील १५ पैकी १३, तर हातकणंगलेतील १७ पैकी १३ उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. त्यातील काहींनी गेल्या २० दिवसांपूर्वी अकौंट सुरू केली आहेत. हातकणंगलेमधील तीन उमेदवारांचे केवळ ई-मेल आयडी आहेत. सहा उमेदवार सोशल मीडियावर नाहीत.सोशल मीडिया कक्षाची नजरनिवडणूक विभागाच्या जिल्हास्तरीय मीडिया, संपर्क व्यवस्थापन व सोशल मीडिया कक्षाला दोन्ही मतदारसंघांतील एकूण १३ उमेदवारांच्या सोशल अकौंट आणि व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकांची माहिती मिळाली आहे. अधिकृतपणे माहिती मिळालेल्या या अकौंटवर सोशल मीडिया कक्षाची नजर आहे. निवडणूक विभागातर्फे प्रमाणित करून घेतला नसलेला मजकूर या सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी आतापर्यंत १५ जणांना नोटीस पाठविली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली.‘डीपी’, प्रोफाईलद्वारे प्रचारव्हॉट्स अ‍ॅपचा ‘डीपी’ आणि फेसबुक अकौंटच्या प्रोफाईलद्वारे अनेकांकडून प्रचार सुरू आहे. राजकीय पक्षांचे चिन्ह, उमेदवारांचे छायाचित्र, त्यांचे निवडणुकीतील चिन्हांचे छायाचित्र, घोषणा या वैयक्तिक आणि ग्रुपच्या डीपी, प्रोफाईलवर झळकत आहेत.