शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

भाजपची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 18:47 IST

Bjp Kolhapur : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं स्वप्निल लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेचा निषेध करत सोमवारी भारतीय जनात पक्षाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देलोकसेवा आयोगावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल कराभाजपची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं स्वप्निल लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेचा निषेध करत सोमवारी भारतीय जनात पक्षाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

यावेळी मंत्र्यांचा सुरू आहे मनमानी कारभार राज्यातील सुशिक्षीत विद्यार्थी मात्र बेरोजगार, एमपीएससीला राजकीय कट्टा बनवू नका, या मागणीचे फलक घेऊन कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रकरणी आयोगावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, मृताच्या कुटुंबीयांना ५० लाख नुकसान भरपाई द्यावी तसेच आयोगाची कार्यपद्धती बदलावी, अशी मागणी करण्यात आली.याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन देण्यात आले. मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून ग्रामीण भागातील अनेक तरुण-तरुणी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी अहोरात्र मेहनत घेतात. ग्रामीण भागातील सुविधांअभावी मोठ्या शहरामध्ये जाऊन या परीक्षांची तयारी करावी लागते, त्यासाठी क्लास, राहणे, जेवण, पुस्तकांचा खर्च मोठा असतो. त्यासाठी कर्ज काढावे लागते. पण गेल्या दोन वर्षांपासून महाविकास आघाडी सरकारकडून कोरोनाचे कारण देत राजकीय अनास्थेपोटी चालढकल करण्याचे काम सुरू आहे.

आयोगाने अनेक परीक्षांचे निकाल जाहीर केले नाहीत तर अनेक परीक्षा प्रलंबित आहेत. यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची कुचंबना होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून आयोगामध्ये फक्त दोनच सदस्य असून इतर सदस्यांची नियुक्ती प्रलंबित आहे.

महाविकास आघाडीचे सरकार अशा गंभीर विषयांत संवेदनशील नसल्याचे दिसत आहे, अशी टीका निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिक्कोडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, विजय जाधव, हेमंत आराध्ये, दिलीप म्हेत्राणी, विजय खाडे, विद्या बनसोडे, सीमा बारामते यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :BJPभाजपाkolhapurकोल्हापूर