वारुळ येथे गटारासाठी काढलेल्या खड्ड्यावरून मारामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:23 IST2021-01-21T04:23:43+5:302021-01-21T04:23:43+5:30

मलकापूर : वारुळ (ता. शाहूवाडी) येथे गावात गटारासाठी काढलेल्या खड्ड्यावरून संजय संतू कांबळे (वय ६०) यांना सुभाष दगडू ...

Fighting over a pit dug for gutters at Warul | वारुळ येथे गटारासाठी काढलेल्या खड्ड्यावरून मारामारी

वारुळ येथे गटारासाठी काढलेल्या खड्ड्यावरून मारामारी

मलकापूर : वारुळ (ता. शाहूवाडी) येथे गावात गटारासाठी काढलेल्या खड्ड्यावरून संजय संतू कांबळे (वय ६०) यांना सुभाष दगडू पाटील (वय ४०) याने जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गटारात ढकलून देत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या घटनेची नोंद शाहुवाडी पोलीस स्थानकात झाली आहे. .

वारुळ पैकी सपकाळवाडी येथील अंगणवाडीसमोर रस्त्याकडेला गटार बांधण्यासाठी खड्डे काढले आहेत. मंगळवार, १९ जानेवारी रोजी रात्री सात वाजता फिर्यादी संजय कांबळे व प्रकाश पाटील हे गटारासाठी काढलेल्या खड्ड्यासंदर्भात बोलत असताना पाठीमागून संशयित सुभाष पाटील याने येऊन संजय कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गटारात ढकलून दिले. गटारात पडल्याने संजय कांबळे हे गंभीर जखमी झाले आहेत.

Web Title: Fighting over a pit dug for gutters at Warul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.