शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

मराठा आरक्षणाचा लढा संभाजीराजेंच्या नेतृत्वाखालीच, राजेंच्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 11:59 IST

कोल्हापुरातील दसरा चौकात शनिवारपासून साखळी उपोषण

कोल्हापूर : समाजातील गटातटांमुळे मराठ्यांचे मोठे नुकसान झाले असून आता सगळे बाजूला ठेवूया, मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली लढ्यासाठी सज्ज राहूया, असा निर्धार बैठकीत करण्यात आला. संभाजीराजे शनिवारपासून आझाद मैदानात उपोषणास बसणार असून ज्यांना मुंबईला जाणे शक्य नाही, त्यांनी दसरा चौकात साखळी उपोषणास सहभागी व्हावे, असा निर्णयही घेण्यात आला.खासदार संभाजीराजे मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी उपोषणास बसणार आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी सोमवारी शाहू स्मारक भवनात बैठक आयाेजित करण्यात आली होती. उपस्थितांनी हात वर करून संभाजीराजेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.मराठा महासंघाचे नेते वसंतराव मुळीक म्हणाले, संभाजीराजे हे मराठा आरक्षणापासून बाजूला गेलेले नाहीत, आरक्षणाचा मुद्दा न्यायालयीन आहे. त्यासाठी पाठपुरावा करत असतानाच इतर मागण्यांना रेटण्याची गरज आहे. त्यासाठी संभाजीराजेंची भूमिका योग्य आहे. मराठा आरक्षणाचा लढा संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालीच लढला जाईल.

फत्तेसिंह सावंत म्हणाले, केंद्र सरकारने मराठा आरक्षणामध्ये योग्य भूमिका घेतली नाही, सर्वच राजकीय पक्ष एकाच माळ्याचे मणी आहेत. संभाजीराजे हेच आमचे नेते आहेत. माजी उपमहापौर दिगंबर फराकटे म्हणाले, मराठा समाजाचा आता संयम संपला आहे. शनिवारी जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन करूया.गणी आजरेकर म्हणाले, मराठा आरक्षणाला आमचा नेहमीच पाठिंबा राहिला आहे. धरणे आंदोलन करून सरकारला तीव्रता दाखवूया, दसरा चौकातील आंदोलनाची जबाबदारी आपण पेलू.

अनिल घाटगे म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने आश्वासने पाळली नाहीत. कमिटी कशाला हवी, आता संपूर्ण समाज पेटून उठेल. यावेळी संजय पोवार, लाला गायकवाड, राजू सावंत, रूपेश पाटील, जयकुमार शिंदे, कमलाकर जगदाळे, रणजीत आयरेकर, किशोर घाटगे, दिलीप सावंत, किसन भोसले, फिरोज उस्ताद, सचिन वरपे, सुनील सामंत, माणिक मंडलीक आदींनी मनोगत व्यक्त केले.इंद्रजीत सावंत, बाळ घाटगे, बाबा महाडीक, राजू जाधव, विष्णू जोशीलकर, उमेश रावळ आदी उपस्थित होते.

राजेंच्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल

मराठा समाजासाठी संभाजीराजेंनी जीव पणाला लावला आहे. त्यांच्या केसाला धक्का जरी लागला तर महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा प्रसाद जाधव यांनी दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती