जगतापनगर येथे दोन गटांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:27 IST2021-02-16T04:27:28+5:302021-02-16T04:27:28+5:30

पाचगाव वार्ताहर : जगतापनगर येथे गणेश जयंती साजरी करणे व अध्यक्षपदावरून ओंकार ग्रुप मित्र मंडळातील दोन गटांत सोमवारी दुपारी ...

Fighting between two groups at Jagtapanagar | जगतापनगर येथे दोन गटांत हाणामारी

जगतापनगर येथे दोन गटांत हाणामारी

पाचगाव वार्ताहर :

जगतापनगर येथे गणेश जयंती साजरी करणे व अध्यक्षपदावरून ओंकार ग्रुप मित्र मंडळातील दोन गटांत सोमवारी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास मारामारी झाली. यात एकजण गंभीर जखमी झाला आहे. करवीर पोलीस घटनास्थळी दाखल होताच सर्वांची पांगापांग झाली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.

घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, ओंकार ग्रुप मित्र मंडळामध्ये दोन ग्रुप पडले आहेत. काही कार्यक्रम घ्यायचा असेल, तर एकाच मंडळामध्ये दोन ग्रुप वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम राबवतात. त्यांच्यात अनेक दिवसांपासून अंतर्गत धुसफूस चालूच होती. सोमवारी गणेश जयंतीनिमित्त मंडळातील जुना वाद उफाळल्याने दगडफेक व काठीने एकमेकांना मारहाण करण्यात आली. यात पाचगावमधील एकजण गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले असल्याचे समजते. ओंकार ग्रुप मित्र मंडळामध्ये फुटबॉल क्लब देखील आहे. त्यांच्यात आर्थिक हिशेब व राजकारणावरून अनेक वेळा शाब्दिक वादावादी झाल्या आहेत.

Web Title: Fighting between two groups at Jagtapanagar