भामटे येथे दोन गटांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:25 IST2021-05-06T04:25:59+5:302021-05-06T04:25:59+5:30

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील भामटे येथे अरुंद गल्लीतील बांधकामावर फरशी, चिरा भरून ट्रक नेण्याच्या कारणांवरून दोन गटांत काठ्या, दगड, ...

Fighting between two groups at Bhamate | भामटे येथे दोन गटांत हाणामारी

भामटे येथे दोन गटांत हाणामारी

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील भामटे येथे अरुंद गल्लीतील बांधकामावर फरशी, चिरा भरून ट्रक नेण्याच्या कारणांवरून दोन गटांत काठ्या, दगड, विटांनी एकमेकांवर हल्ला करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी दोन्ही गटांचे तिघे जखमी झाले असून एकूण सतरा जणांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भामटे येथे बळीराम पांडुरंग अस्वले यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. त्यावेळी बांधकामाला लागणारी फरशी व चिरा घेऊन ट्रक अरुंद गल्लीतून बांधकामस्थळी जात होता. त्याचवेळी गल्लीतील डॉ. इंद्रजीत पाटील यांच्या घराच्या कंपौऊंडला ट्रक घासला व कंपाऊंडची भिंत कोसळली. त्यावेळी पाटील यांच्या घरातील वृद्धेने तो ट्रक अडवला, त्यावरून दोन्ही गटांत वाद निर्माण झाला. दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला केल्याची परस्पर विरोधी तक्रार दिली.

इंद्रजीत पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बळीराम पांडुरंग अस्वले, विश्वास पांडुरंग अस्वले, सागर आनंदा अस्वले, सचिन बाजीराव अस्वले, बाजीराव यशवंत अस्वले, रणजीत तानाजी अस्वले, प्रकाश शिवाजी अस्वले, संजय परशराम अस्वले, दिलीप परशराम अस्वले (सर्व रा. भामटे) यांच्यावर गुन्हा नोंदवला.

अरुंद गल्लीतून जाताना रस्त्यात दगड टाकून ट्रक अडवला, त्यामुळे जाब विचारताना काठीने मारहाण केल्याची तक्रार बळीराम पांडुरंग अस्वले यांनी दिली. त्यानुसार इंद्रजीत पांडुरंग पाटील, भगवान सीताराम पाटील, सत्यजीत पांडुरंग पाटील, भिवाजी जोतीराम पाटील, पांडुरंग सीताराम पाटील, निरंजन शिवाजी पाटील, विश्वजीत भगवान पाटील, शिवाजी जोतीराम पाटील (सर्व रा. भामटे) यांच्यावर गुन्हा नोंदवला.

Web Title: Fighting between two groups at Bhamate