शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

भरधाव मोटारीने पर्यटकांना उडविले, महिलेसह दोघे जखमी: टेंबे रोडवरील थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 21:04 IST

कोल्हापूर शहरातील मध्यवस्तीमध्ये गजबजलेल्या टेंबे रोडवर वनवे तोडून भरधाव मोटारस्वाराने पर्यटक महिलेसह दोघांना उडविले. सुमारे पंधरा फूट फरफटत नेल्याने दोघे गंभीर जखमी झाले. पूजा श्रीनिवास पोटे (वय २८), साईराज कैलास पोटे (२१, दोघे रा. वजप, ता. कर्जत, जि. रायगड) अशी त्यांची नावे आहेत. यामध्ये एक मोपेडचालक महिलाही जखमी झाली आहे. जखमींना तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले.

ठळक मुद्देभरधाव मोटारीने पर्यटकांना उडविले, महिलेसह दोघे जखमी: टेंबे रोडवरील थरारसंतप्त नागरिकांकडून चालकास बेदम मारहाण करून मोटारीची तोडफोड

कोल्हापूर : शहरातील मध्यवस्तीमध्ये गजबजलेल्या टेंबे रोडवर वनवे तोडून भरधाव मोटारस्वाराने पर्यटक महिलेसह दोघांना उडविले. सुमारे पंधरा फूट फरफटत नेल्याने दोघे गंभीर जखमी झाले. पूजा श्रीनिवास पोटे (वय २८), साईराज कैलास पोटे (२१, दोघे रा. वजप, ता. कर्जत, जि. रायगड) अशी त्यांची नावे आहेत. यामध्ये एक मोपेडचालक महिलाही जखमी झाली आहे. जखमींना तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले.दरम्यान, संतप्त नागरिकांनी मोटार (एमएच १३ एन ४१९३)ची तोडफोड करीत चालक प्रदीप पाटील याला बेदम मारहाण केली. कैलास पोटे यांनीच त्याला नागरिकांच्या तावडीतून सुटका करीत सीपीआर रुग्णालयात दाखल केले. बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेने सुमारे अर्धा तास टेंबे रोडवर गर्दी झाल्याने वाहतूक ठप्प झाली. या अपघाताची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली आहे. हवालदार दिलीप इदे तपास करीत आहेत.कैलास पोटे हे अंबाबाई दर्शनासाठी कुटुंबासह बुधवारी कोल्हापुरात आले आहेत. त्यांनी टेंबे रोडवर आपली कार उभी केली होती. दर्शन घेऊन ते दुपारी जेवण करून सिंधुदुर्गला जाण्यासाठी कारकडे येण्यासाठी निघाले. त्यांच्या कुटुंबातील आठ-दहाजण रस्त्याने चालत होते. दिलबहार तालीम मंडळ चौकातून टेंबे रोडवरून मिरजकर तिकटीकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ होती.

यावेळी टेंबे रोडवर विरोधी दिशेने आलेली मोटार शिवाजी स्टेडियमकडे जात होती. ती भरधाव आल्याने वनवेवरून जाणाऱ्या वाहनधारकांची आणि पादचाऱ्यांची तारांबळ उडाली. समोरून आलेली मोटार पोटे कुटुंबीयांच्या गराड्यात घुसली. यावेळी काहीजण बाजूला फेकले गेले; तर पूजा पोटे व साईराज पोटे मोटारीखाली सापडले. त्यांच्या कुटुंबीयांनी आरडाओरड केली, तरीही चालक प्रदीप पाटील याने त्या दोघांना पंधरा फूट फरफटत नेले.

नागरिकांनी आडवे जाऊन शिवाजी स्टेडियमजवळील गाळ्याजवळ मोटार थांबविली. पूजा पोटे व साईराज पोटे यांच्या डोक्याला, हातापायाला, पाठीला गंभीर दुखापत झाली होती. नागरिकांनी या दोघांना त्यांच्याच कारमधून ‘सीपीआर’मध्ये पाठविले. तसेच या मार्गावरून जाणाऱ्या एका महिलेची मोपेड मोटारीखाली अडकली. त्यामुळे नागरिकांची मोठी पळापळ झाली.

 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर