शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील कळंबा कारागृहात कैद्यांच्या दोन टोळ्यांमध्ये उडाली धुमश्चक्री; एकजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 11:25 IST

कारागृहात अचानक कैद्यांचे दोन गट भिडल्याने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली

कोल्हापूर : कळंबा कारागृहात मोक्का अंतर्गत शिक्षा भोगत असलेल्या सातारा जिल्ह्यातील कैद्यांच्या दोन टोळ्यांमध्ये पूर्ववैमनस्यातून धुमश्चक्री उडाली. सोमवारी (दि. २) सकाळी नऊच्या सुमारास घडलेल्या घटनेत मल्लिक ऊर्फ दत्तात्रय रामचंद्र जाधव (रा. सातारा) हा कैदी जखमी झाला. याबाबत कारागृह अधिकारी सतीश दिनकरराव माने (वय ५४, रा. कारागृह अधिकारी निवासस्थान, कळंबा) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी चार कैद्यांवर गुन्हा दाखल केला.सलीम ख्वाजासाहेब शेख, रोहन राजेंद्र जाधव, समाधान राजेेंद्र जाधव आणि प्रतीक संजू जाधव (सर्व रा. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या कैद्यांची नावे आहेत. कैदी मल्लिक ऊर्फ दत्तात्रय जाधव याला मधुमेहाचा त्रास होत असल्याने सोमवारी सकाळी कारागृहातील कर्मचारी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी कारागृहातील दवाखान्यात घेऊन गेले होते. तपासणी करून परतताना सर्कल क्रमांक सहाच्या समोरील रिकाम्या जागेत चार कैद्यांनी जाधव याला अडवले.धक्काबुक्की करीत त्याच्यावर विटा आणि दगड भिरकावले. हा प्रकार घडताच कारागृह कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेऊन कैद्यांना पांगवले. जाधव याच्या गटातील ही काही कैदी धावून आल्याने तणाव वाढला होता. दरम्यान, मारहाणीत दत्तात्रय जाधव जखमी झाला.

कारागृह कर्मचाऱ्यांची उडाली तारांबळकारागृहात अचानक कैद्यांचे दोन गट भिडल्याने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. तातडीने सर्व कर्मचाऱ्यांनी बळाचा वापर करीत कैद्यांना त्यांच्या सर्कलमध्ये घालवले. तसेच दगडफेक आणि मारहाण करणाऱ्या कैद्यांना ताब्यात घेऊन त्यांची स्वतंत्र सर्कलमध्ये रवानगी करण्यात आली. या घटनेमुळे कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

कारागृहाची झडतीकारागृहातील एका सर्कलमध्ये रविवारी (दि. १) सीमकार्ड नसलेला मोबाइल सापडला होता. त्यानंतर सतर्क झालेल्या कारागृह अधिकाऱ्यांनी सोमवारी सर्व सर्कलची झडती घेतली. झडती दरम्यान कर्मचाऱ्यांना अन्य मोबाइल किंवा सीमकार्ड हाती लागले नाही, अशी माहिती प्रभारी कारागृह अधीक्षक पांडुरंग भुसारी यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस