‘पंधराव्या वित्त’ १५ डिसेंबरला आयुक्तांसमोर सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:01 IST2020-12-05T05:01:37+5:302020-12-05T05:01:37+5:30

जिल्हा परिषदेतील निधीचा वाद गेल्या तीन महिन्यांपासून उच्च न्यायालयात सुरू आहे. आता हे प्रकरण विभागीय आयुक्तांकडे गेलेे आहे. पुणे ...

'Fifteenth Finance' hearing before the Commissioner on December 15 | ‘पंधराव्या वित्त’ १५ डिसेंबरला आयुक्तांसमोर सुनावणी

‘पंधराव्या वित्त’ १५ डिसेंबरला आयुक्तांसमोर सुनावणी

जिल्हा परिषदेतील निधीचा वाद गेल्या तीन महिन्यांपासून उच्च न्यायालयात सुरू आहे. आता हे प्रकरण विभागीय आयुक्तांकडे गेलेे आहे. पुणे विभागाचे उपायुक्त पी. बी. पाटील यांनी १५ डिसेंबर रोजी सुनावणी ठेवली आहे. सुनावणीवेळी सर्व पुरावे व कागदपत्रांसह हजर राहण्याबाबतचे पत्र वंदना मगदूम यांना पाठवले आहे. मगदूम यांच्या तक्रारीत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) देसाई यांना प्रतिवादी केले आहे.

- राजाराम लोंढे

Web Title: 'Fifteenth Finance' hearing before the Commissioner on December 15