शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

थोड्या तक्रारी; काही ठिकाणी सेवाही चांगली -‘राधानगरी‘तील आरोग्य केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 21:43 IST

राधानगरी तालुक्यातील सुमारे सव्वादोन लाख लोकसंख्येसाठी जिल्हा परिषेदेच्या आरोग्य विभागाची सहा आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. एका ठिकाणी आरोग्य पथक आहे.

ठळक मुद्देरांबाबत संमिश्र प्रतिक्रिया-राशिवडे, धामोडबाबत तक्रारी; कसबा तारळे, कसबा वाळवेत चांगली सेवा

संजय पारकर ।राधानगरी : राधानगरी तालुक्यातील सुमारे सव्वादोन लाख लोकसंख्येसाठी जिल्हा परिषेदेच्या आरोग्य विभागाची सहा आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. एका ठिकाणी आरोग्य पथक आहे.३८ ठिकाणी आरोग्य उपकेंदे्र आहेत. यासाठी विविध संवर्गातील १३७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या११६ कर्मचारी कार्यरत आहेत. सर्वसाधारणत: यातून दिलेल्या सेवांबाबत संमिश्र प्रतिक्रिया आहेत. सरवडे, कसबा तारळे, कसबा वाळवे या दवाखान्यांत चांगली सेवा मिळते, असे दिसते. तर राशिवडे, धामोड येथील सेवांबाबत तक्रारी आहेत.प्रत्येक आरोग्य केंद्रांत दोन डॉक्टर गरजेचे असतात. सध्या सरवडे व कसबा वाळवे येथे एकच डॉक्टर आहे. मात्र, या दोन्ही ठिकाणी मिळणाऱ्या सेवेबाबत चांगल्या प्रतिक्रिया आहेत. याउलट राशिवडे व धामोड येथे मोठ्या तक्रारी आहेत. राशिवडे येथे रुग्णांना औषधे, सलाईनच्या पाईप व अन्य काही साहित्य बाहेरून विकत आणण्यास सांगितले जाते. दोन्हीपैकी एकच डॉक्टर उपस्थित असतात, तर बºयाच वेळा सहायकच रुग्णांवर उपचार करतात, अशा तक्रारी आहेत. धामोड येथे दूरवरून येणाºया रुग्णांना दुरुत्तरे करीत वेळीच दखल घेतली जात नाही. बºयाच वेळा त्यांची हेळसांड होत असल्याची तक्रार होत आहे.तालुक्यात आडोली, म्हासुर्ली व आणाजे येथे आयुर्वेदिक दवाखाने आहेत. मात्र, यांची अवस्था ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे. या तिन्ही ठिकाणी मिळून एकच डॉक्टर आहे. आठवड्यातून प्रत्येकी दोन दिवस त्यांनी हजर राहण्याची अपेक्षा आहे. मात्र, ते जेमतेम एखाद्या दिवशीच हजेरी लावतात, असे स्थानिक लोक सांगतात. तसेच यासाठी आवश्यक असलेली औषधे अपवादानेच मिळतात. त्यामुळे लोकही येथे जाण्याचे टाळतात. या ठिकाणी एका सहायकाची नेमणूक आहे; पण डॉक्टर नसतील तेव्हा तोही सापडत नाही. म्हासुर्ली व आडोली ही दोन्ही गावे दुर्गम भागात असून, त्या परिसरात अनेव गावे व वाड्या-वस्त्या आहेत. त्यांना जवळपास सरकारी दवाखाने नाहीत.तालुक्यात मागील वर्षात एक लाख ११ हजार ६३७ रुग्णांनी बाह्य उपचार घेतले आहेत. तर सात हजार ६५२ रुग्णांनी काही दिवसांसाठी राहून उपचार घेतले आहेत. केंद्रनिहाय असे रुग्ण याप्रमाणे : कंसात आंतररुग्ण धामोड १३७७३ (११५७), राशिवडे २३४४० (९२३), सरवडे १९२८९ (१३९५), कसबा तारळे १९२१५ (१५२१), ठिकपुर्ली १५१५१ (१३४१), कसबा वाळवे २०७६९ (१२२५). वर्षभरात एका मातेचा मृत्यू झाला असून, तब्बल १२ नवजात बालके मृत्युमुखी पडली आहेत. यापैकी सहा बालके उपजत दगावली आहेत. तर एक ते पाच वयोगटातील आठ बालकेही दगावली आहेत.आरोग्य विभागातील डॉक्टर व काही पदे निवासी स्वरूपाची असतात. तसेच आरोग्य उपकेंद्रात नेमणूक असलेल्या आरोग्यसेविका यांनीही त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणी राहणे बंधनकारक आहे. त्यासाठी त्यांना निवास्थान उपलब्ध करून दिलेले आहे. मात्र, अपवादात्मक ठिकाणीच कर्मचारी निवासी आहेत. बहुंताश कर्मचारी शहरात किंवा आपल्या गावात राहून ये-जा करतात. अनेक कर्मचारी अनेक वर्षे एकाच ठिकाणी आहेत. त्यामुळे त्यांची एकाधिकारशाही निर्माण झाली आहे. यापैकी काही कामचुकार झाले आहेत. नवीन, कंत्राटी येणाऱ्यांना राबवून घेतले जाते. तालुक्यात चांगले काम करणारे डॉक्टर, कर्मचारीही आहेत. होऊन गेले आहेत.कसबा तारळे येथे डॉ. एम. एम. कदम यांनी त्यांच्या काळात तेथे केंद्राचा कायापालट केला होता.तत्पर व योग्य सेवा मिळत असल्याने त्यावेळी तेथे येणाºया रुग्णांची संख्या वाढली होती. मात्र, त्यांच्या बदलीनंतर हे प्रमाण कमी झाले. धामोड येथे ज्ञानेश्वर ठोंबरे या डॉक्टरांनी आपल्या काळात २४ तास रुग्णसेवा करण्याचा संकल्प करून त्याची सुरुवात केली होती. प्रत्येक गावात आशा स्वयंसेविकांची नेमणूक केली आहे.दाजीपूरची इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेतदाजीपूर येथे नवीन आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत बांधून पूर्ण झाली आहे. मात्र, अजून अन्य सोपस्कार पूर्ण न झाल्याने ते सुरू झालेले नाही. म्हासुर्ली येथेही नवीन केंद्र मंजूर झाले आहे. इमारतीचा भूमिपूजन सोहळाही झाला आहे. मात्र, पुढे काहीच हालचाल नाही.तालुक्यातील आरोग्य सेवेबाबत काही अडचणी व तक्रारी आहेत. मात्र, चर्चा व समन्वयातून मार्ग काढून त्यातून मार्ग काढला जाईल. प्रसंगी कठोर कारवाई केली जाईल.- डॉ. आर. आर. शेटे, तालुका आरोग्य अधिकारी.

आरोग्य सुविधेची गरज असलेल्या दुर्गम अशा म्हासुर्ली येथील आयुर्वेदिक दवाखाना, हा असा सदा बंद अवस्थेत असतो.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर