महाराष्ट्र ॲकॅडमी ऑफ सायन्सेसच्या फेलोपदी के. एम. गरडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:23 IST2020-12-22T04:23:11+5:302020-12-22T04:23:11+5:30
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्रा. के. एम. गरडकर यांची महाराष्ट्र ॲकॅडमी ऑफ सायन्सेसच्या फेलोपदी निवड झाली आहे. ...

महाराष्ट्र ॲकॅडमी ऑफ सायन्सेसच्या फेलोपदी के. एम. गरडकर
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्रा. के. एम. गरडकर यांची महाराष्ट्र ॲकॅडमी ऑफ सायन्सेसच्या फेलोपदी निवड झाली आहे. यावर्षी विद्यापीठातून त्यांची एकमेव निवड झाली.
प्रा. गरडकर हे नॅनोमटेरिअल्स या क्षेत्रात काम करीत असून त्यांनी पाण्यातील रंगद्रव्यांचे विघटन सूर्यप्रकाशाच्या मदतीने करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ही रंगद्रव्ये फक्त अर्ध्या तासामध्ये जवळपास ९५ टक्के नष्ट केली आहेत. त्यांच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एकूण १५० शोधपत्रिका प्रकशित झाल्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १० विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी मिळाली आहे. सध्या ते डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल केमिस्ट्रीचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.
प्रा. गरडकर यांना संशोधनासाठी भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीची शिष्यवृत्ती (वर्ष २०१८) मिळाली होती. ते अनेक आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेच्या संपादकीय मंडळात संपादक आणि परीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
फोटो (२११२२०२०-कोल-के एम गरडकर (युनिर्व्हेसिटी)