शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कोरज येथे झाला असाही सत्कार..!

By admin | Updated: July 31, 2014 23:30 IST

दंडाची अशी शिक्षा : मुख्याध्यापकाने उचलला सत्काराचा खर्च

चंदगड : भारतीय परंपरेत अनादी काळापासून गुरूला महत्त्व आहे. महाभारत, रामायणात तर गुरू-शिष्यांच्या नात्यांची उदाहरणे सर्वश्रुत आहेत. पूर्वी विद्यार्थी गुरूला दैवत मानत होते. मात्र, आजच्या संगणकाच्या युगात गुरू-शिष्यांचे नाते हरवत चालले आहे. प्रथम संगणक, नंतर फेसबुक, ई-मेल आणि आता वॉटस अ‍ॅप आदी वापरांमुळे जग जवळ आले, पण या सर्वांमुळे माणसातील माणुसकी हरवत चालली आहे. याचे उदाहरण कोजर येथील शाळेत पहावयाला मिळाले. शिक्षण क्षेत्रात सध्या हा सत्कार चर्चेचा विषय ठरला आहे.कोरज (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी प्रतीक्षा उमाजी शिरगावकर हिने तालुकास्तरावरील सांस्कृतिक स्पर्धेत कथाकथन विभागात प्रथम क्रमांक मिळविला. त्यामुळे तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. मात्र, या विद्यार्थिनीच्या यशाची बातमी स्थानिक वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाली होती. त्यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापकाचे नाव नसल्याने त्यांनी त्या विद्यार्थिनीला जिल्हास्तरीय स्पर्धेला जाण्यासाठी जाणीवपूर्वक रोखले. तिला जिल्हास्तरीय स्पर्धेच्या तारखा न कळाल्याने तिला या स्पर्धेला मुकावे लागले. या विरोधात पालक, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. शिक्षण विभागाच्या अहवालात या मुख्याध्यापकाने जाणीवपूर्वक जिल्हास्तरीय स्पर्धेच्या तारखा न कळविल्याचा आरोप अहवालात ठेवण्यात आल्याने ते कारवाईस पात्र असल्याचा सल्ला दिला होता. मात्र, या मुख्याध्यापकावर शिक्षण विभागाने कारवाई करण्याऐवजी वशिलेबाजी मध्यस्थातर्फे हे प्रकरण मिटवा-मिटवीसाठी जोरदार प्रयत्न झाले.शेवटी हे प्रकरण पं.स.च्या सभापती ज्योती पाटील यांच्या कोर्टात गेले. त्यांनीही या मुख्याध्यापकावर कारवाई करण्याऐवजी या विद्यार्थिनीला प्रोत्साहन मिळावे यासाठी संबंधित मुख्याध्यापकाने तिचा सत्कार करावा व दंड म्हणून सत्काराचा खर्च उचलावा, असे सर्वानुमते ठरविण्यात आले. मात्र, मुख्याध्यापकाने या खर्चाची जबाबदारी उचलण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे शिक्षण विभागाने त्या मुख्याध्यापका बोलावून कारवाईची इशारा दिल्याने मुख्याध्यापकाने या सत्काराला होकार दिला. त्यानुसार काल कोरज येथे प्रतीक्षा शिरगावकर हिचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)