विकासात दुजाभाव झाल्याची भावना
By Admin | Updated: February 23, 2015 23:56 IST2015-02-23T23:42:42+5:302015-02-23T23:56:59+5:30
शौचालयाचा प्रश्न बिकट : स्वच्छता, पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आक्षेप

विकासात दुजाभाव झाल्याची भावना
कोल्हापूर : शहरातील गजबजलेला आणि सीपीआर, करवीर तहसील कार्यालय, जिल्हा कोषागार कार्यालय, पोलीस स्टेशन अशी कार्यालये असलेला प्रभाग म्हणजे ट्रेझरी आॅफिस प्रभाग होय. येथील मुख्य रस्त्यांचे काम झालेले असले तरी चिंचोळ्या असलेल्या गल्लीबोळांतील रस्ते व गटारींची अक्षरश: वाट लागली आहे.
त्याचप्रमाणे सोमवार पेठ, महाराणा प्रताप चौकातील केएमटी टर्मिनस बस या इमारतीच्या पिछाडीस असलेल्या ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या (बीओटी) तत्त्वावर बांधण्यात आलेल्या व अकबर मोहल्ला परिसरात वर्षानुवर्षे असलेल्या शौचालयांची स्थिती बनली आहे. अकबर मोहल्ला परिसरातील १२ पैकी दहा शौचालये बंद स्थितीत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.
सोमवारपेठ, स्वंयभू गणेश मंदिर परिसर, घिसाड गल्ली परिसरात विकासकामे, तर दुसरी अकबर मोहल्ला आणि वरच्या भागाकडे दुर्लक्ष केल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. विद्यमान नगरसेवक विकासकामांत दुजाभाव करीत असल्याच्या भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.
उर्वरित आठ महिन्यांत सुमारे एक कोटी रुपयांची कामे करणार आहे. त्यामध्ये सोडियम हायमास्ट दिवे लावण्यात येणार आहते. तसेच अकबर मोहल्ला येथील पाण्याचा प्रश्न सोडविणार आहे. तसेच सोमवार पेठेत नवीन शौचालयांचे काम पूर्ण झाले आहे.
- रमेश पोवार, नगरसेवक