शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अलमट्टीवरुन कोल्हापूर, सांगलीत धास्ती; दिल्लीतील बैठक स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 13:19 IST

महाराष्ट्र शासनाच्या भूमिकेकडे लक्ष

कोल्हापूर : कृष्णा कालवा योजनेंतर्गत अलमट्टी धरणाची उंची पाच मीटरने वाढवण्यासाठी कर्नाटक सरकार सध्या आक्रमक दिसत आहे. यामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात महापुराची धास्ती वाढणार आहे. यासंबंधी चर्चा करण्यासाठी दिल्लीत महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांतील मंत्र्यांची बैठक मंगळवारी होणार होती; पण अचानक बैठक रद्द झाल्याने पश्चिम महाराष्ट्रातील पूरबाधित परिसरात चिंतेचे ढग दाटून आले आहेत.धरणाची सध्याची उंची ५१९.६ मीटर उंच असून, १२३ टीएमसी पाणी क्षमता आहे. त्याची उंची वाढवून ५२४.२६ करण्यासाठी कर्नाटक सरकारने मान्यता दिली आहे. एक वर्षापासून कर्नाटक शासन केंद्रीय पातळीवरही पाठपुरावा करीत आहे. धरणाची उंची वाढवल्याने पाणी साठवून कर्नाटकातील दोन लाख एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. परिसरातील पिण्याच्या प्रश्न निकालात निघणार आहे. म्हणूनच कर्नाटक सरकार उंची वाढवण्यावर ठाम आहे; पण याचा फटका पावसाळ्यात कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला बसणार आहे. धरणातील पाणी साठ्याचा फुगवटा वाढल्याने या दोन जिल्ह्यातील नद्यांतील पाण्याच्या विसर्ग गतीने होणार नाही. पूरस्थितीमध्ये भर पडणार आहे. म्हणून धरणाच्या उंची वाढवण्यास या परिसरातील शेतकऱ्यांचा, रहिवाशांचा विरोध आहे; पण विरोध न जुमानता कर्नाटक सरकार उंची वाढवण्यासाठी आवश्यक असलेली १ लाख ३३ हजार ८६७ एकर जमीन संपादनाची प्रक्रिया गतीने करीत आहे.

‘आंध्र’, ‘तेलंगणा’ला दुष्काळाची भीतीअलमट्टी धरणाची उंची वाढल्याने पावसाळ्यात पाण्याचा फुगवटा वाढून काेल्हापूर, सांगली जिल्ह्याला महापुराची भीती आहे. याउलट पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी न मिळाल्याने आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यांना दुष्काळाचे भय निर्माण झाले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकDamधरण