शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात कुंटणखाने चालवणारी फातिमा देसाई वर्षासाठी स्थानबद्ध; पिटा कायद्यांतर्गत राज्यात पहिलीच कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 17:14 IST

वारंवार सूचना देऊनही तिच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. उलट तिने काही पीडित महिलांच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन त्यांचे शोषण केले.

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी कुंटणखाने चालवून महिलांचे लैंगिक शोषण करणारी फातिमा ऊर्फ मुस्कान विजय देसाई (वय ३३, रा. राजीव गांधी वसाहत, मार्केट यार्ड, कोल्हापूर) हिला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागामार्फत पोलिस अधीक्षकांनी पाठवलेल्या प्रस्तावास जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली. पिटा कायद्यांतर्गत झालेली ही राज्यातील पहिलीच प्रतिबंधात्मक कारवाई आहे.कोल्हापूर शहरासह करवीर आणि पन्हाळा तालुक्यांतील काही लॉज आणि खासगी ठिकाणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत फातिमा ऊर्फ मुस्कान देसाई हिने कुंटणखाने चालवल्याचे समोर आले. वारंवार सूचना देऊनही तिच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. उलट तिने काही पीडित महिलांच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन त्यांचे शोषण केले.तिच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागातील सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ यांनी प्रस्ताव तयार केला होता. पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार तो जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे पाठवला होता. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पडताळणी करून मंगळवारी (दि. १०) प्रस्तावास मंजुरी दिली. त्यानुसार आरोपी देसाई हिला एक वर्षासाठी पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्यासह शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक कोल्हाळ आणि सहायक फौजदार सचिन सूर्याजी पाटील यांनी स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार केला.

वर्षभर कारागृहाची हवा..अनैतिक मानवी व्यापार म्हणजे पिटांतर्गत आरोपींना स्थानबद्ध करण्याची कायदेशीर तरतूद यापूर्वी नव्हती. राज्य सरकारने २०२५ मध्ये यात सुधारणा केली. महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हिडिओ पायरेट्स गुन्हे, वाळू तस्कर, अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्यांसह आता यात अनैतिक मानवी व्यापार आणि जुगार अड्डे चालविणाऱ्यांवरही स्थानबद्धतेची कारवाई केली जाते. त्यानुसार कोल्हापूर पोलिसांनी पिटांतर्गत केलेली ही पहिलीच कारवाई असल्याचे पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी सांगितले. यामध्ये संबंधित महिलेला वर्षभर कारागृहात स्थानबद्ध केले जाते.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Brothel Operator Fatima Desai Detained; First PITA Act Action

Web Summary : Fatima Desai, who ran brothels in Kolhapur, is detained for a year under the PITA Act. This first-of-its-kind action follows her exploitation of women, leading to her imprisonment in Yerwada Jail.