प्रयाग चिखलीत पिता-पुत्रावर विळ्याने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:24 IST2020-12-29T04:24:57+5:302020-12-29T04:24:57+5:30

कोल्हापूर : किरकोळ कारणावरून झालेल्या वादावादीतून एकाने पिता-पुत्रास विळ्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी करण्याचा प्रकार घडला. या घटनेत ...

Father-son attack in Prayag mud | प्रयाग चिखलीत पिता-पुत्रावर विळ्याने हल्ला

प्रयाग चिखलीत पिता-पुत्रावर विळ्याने हल्ला

कोल्हापूर : किरकोळ कारणावरून झालेल्या वादावादीतून एकाने पिता-पुत्रास विळ्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी करण्याचा प्रकार घडला. या घटनेत राहुल बाळासाहेब दळवी (२८) व त्याचे वडील बाळासाहेब दळवी (५५, दोघेही रा. प्रयाग चिखली, ता. करवीर) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना प्रयाग चिखली येथे घडली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भाऊबंदकीतील राकेश बळवंत दळवी याचा हळद व गुळाचा कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रमात राहुलचे वडील बाळासाहेब दळवी यांनी पाहुण्यांना लवकर आटोपते घ्या, पाहुणे अजून जेवायचे आहेत असे जमलेल्या लोकांना सांगितले. त्याचा राग मनात धरून विठ्ठल यशवंत दळवी (२८, रा. प्रयाग चिखली) याने बाळासाहेबांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी वाद सोडविण्यासाठी आलेल्या राहुल दळवी याच्यावर विळ्याने वार करून त्यालाही जखमी केले. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी राहुल दळवी याने दिलेल्या तक्रारीवरून विठ्ठल दळवी याच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Father-son attack in Prayag mud