शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अकरा महिन्यांच्या चिमुकलीला आईने विकले, बापाने शोधले; कोल्हापूर पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 17:33 IST

चिमुकलीला एक लाखात गोव्यातील दाम्पत्याला विकले होते

कोल्हापूर : निहृदयी आईने अवघ्या ११ महिन्यांच्या चिमुकलीला एक लाखात गोव्यातील दाम्पत्याला विकले होते. याबाबत बापाने फिर्याद दिल्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिसांना चिमुकलीचा शोध लावण्यात यश आले नाही. अखेर बापानेच गोव्यात जाऊन चिमुकलीचा शोध घेऊन तिचा ताबाही मिळवला. या घटनेतून मुलीला कुशीत घेण्यासाठी आसुसलेल्या बापाची तळमळ स्पष्ट आली, तर निवडणूक कामाचे कारण पुढे करून केवळ तपास सुरू असल्याचे सांगणाऱ्या पोलिसांची कार्यपद्धती सर्वांसमोर आली.इंगळी (ता. हातकणंगले) येथील पूनम दिलीप ढेंगे (वय २८) हिने पतीला कोणतीही कल्पना न देता तिची ११ महिन्यांची मुलगी एक लाखात गोव्यातील दाम्पत्याला विकली होती. हा प्रकार लक्षात येताच १६ एप्रिल रोजी दिलीप ढेंगे यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी मुलीची आई पूनम ढेंगे हिच्यासह तिचा मित्र सचिन कोंडेकर, एका रुग्णालयातील कर्मचारी किरण पाटील आणि मुलगी विकत घेणाऱ्या गोव्यातील दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला होता.चिमुकलीच्या शोधासाठी दोन वेळा पथक गोव्याला जाऊन आल्याची माहिती पोलिसांनी फिर्यादी ढेंगे यांना दिली. मात्र, तिचा शोध लागला नव्हता. निवडणूक बंदोबस्ताचे कारण देऊन पोलिसांकडून तपासात चालढकल सुरू होती. अखेर चिमुकल्या मुलीचे वडील दिलीप ढेंगे यांनीच गोव्यातील संशयित दाम्पत्याचा फोन नंबर आणि पत्ता मिळवला. त्यांच्याशी संपर्क करून मुलगी परत देण्याची विनवणी केली.अखेर ७ मे रोजी एका वकिलाच्या मध्यस्थीने त्यांनी गोव्यात जाऊन फातिमा फर्नांडिस आणि जेरी पॉल नो-होन्हा यांच्याकडून मुलीचा ताबा घेतला. कायदेशीर अडचणी लक्षात घेऊन गोव्यातील दाम्पत्यानेही आढेवेढे न घेता मुलीचा ताबा दिला. दोन दिवसांपूर्वीच बापाने मुलीचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. या संपूर्ण घडामोडींमध्ये एका पित्याची मुलगी परत मिळवण्यासाठी सुरू असलेली धडपड यशस्वी झाली. त्याचवेळी पोलिसांच्या तपास कामावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले.सौदा सहा लाखांचा?मुलगी दिल्यानंतर तिच्या आईला एक लाख रुपये मिळाले होते. मात्र, मुलगी मिळविण्यासाठी गोव्यातील दाम्पत्याने सहा लाख दिल्याची माहिती समोर येत आहे. मधल्या मध्ये पाच लाख कोणी हडप केले? संशयितांना अशा प्रकारे आणखी काही बाळांची विक्री केली आहे काय? याचा छडा लावण्याचे काम पोलिसांना करावे लागणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस