कोल्हापुरजवळ भीषण अपघातात पिता-पुत्र ठार
By Admin | Updated: March 11, 2017 11:43 IST2017-03-11T11:43:42+5:302017-03-11T11:43:42+5:30
दोन दुचाकींची समोरासमोर धडक

कोल्हापुरजवळ भीषण अपघातात पिता-पुत्र ठार
कोल्हापुरजवळ भीषण अपघातात पिता-पुत्र ठार
कोल्हापूर : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात वडील आणि मुलगा जागीच ठार झाले.
रजपूतवाडी येथे दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या धडकेत केर्ले गावचे श्रीपती गोळे आणि पंडित गोळे हे दोघेजण जागीच ठार झाले. गोळे पिता-पुत्र फुलविक्रीसाठी दुचाकीवरुन कोल्हापुरकडे जात असताना समोरुन आलेल्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. त्यात पिता-पुत्र दुचाकीवरुन उडून रस्त्यावर पडले., याचवेळी पाठीमागून भरधाव येणाऱ्या संजीवन पब्लिक स्कूलची बस त्यांच्या अंगावरुन गेली. त्यात पिता-पुत्र जागीच ठार झाले. अपघाताची वर्दी मिळतातच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.