पापाची तिकटी परिसरात पिता-पुत्रास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:17 IST2021-06-05T04:17:17+5:302021-06-05T04:17:17+5:30

कोल्हापूर : पापाची तिकटी शनी मंदिरासमोरील परिसरात पिता-पुत्रास अज्ञात कारणावरून मारहाण करून जखमी केले. याबाबत आबीद इस्माईल तांबोळी (वय ...

Father and son beaten in sin ticket area | पापाची तिकटी परिसरात पिता-पुत्रास मारहाण

पापाची तिकटी परिसरात पिता-पुत्रास मारहाण

कोल्हापूर : पापाची तिकटी शनी मंदिरासमोरील परिसरात पिता-पुत्रास अज्ञात कारणावरून मारहाण करून जखमी केले. याबाबत आबीद इस्माईल तांबोळी (वय ४५, रा. शनिवार पेठ ) यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार उमर मन्सूर सय्यद (वय२५), जुबेर मन्सूर सय्यद (वय १८, रा. अकबर मोहल्ला) या संशयितांविरोधात गुन्हा नोंद झाला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पापाची तिकटी परिसरातील शनी मंदिराजवळ गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास संशयित फिर्यादीच्या मुलगा साकीब यास मारहाण करीत होते. या दरम्यान फिर्यादी त्याठिकाणी गेले असता, संशयितांनी त्यांनाही हाताने व काठीने मारहाण करीत जखमी केले. जीवे ठार मारण्याची धमकी देत दुकानावर दगडही मारला. याबाबतीच फिर्याद तांबोळी यांनी दिली. त्यानुसार दोघा संशयितांवर गुन्हा नोंद झाला असून, पोलीस अंमलदार मुन्ना कुडची हे तपास करीत आहेत.

Web Title: Father and son beaten in sin ticket area