फत्यापूरचे जवान दीपक घाडगे शहीद
By Admin | Updated: March 9, 2017 23:07 IST2017-03-09T23:07:53+5:302017-03-09T23:07:53+5:30
फत्यापूरचे जवान दीपक घाडगे शहीद

फत्यापूरचे जवान दीपक घाडगे शहीद
श्रीनगर/अंगापूर : पाकिस्तानी सैन्यांशी उडालेल्या चकमकीत सातारा तालुक्यातील फत्यापूर येथील जवान दीपक जगन्नाथ घाडगे (वय २७) हे शहीद झाले. यामुळे फत्यापूर परिसर शोकसागरात बुडाला आहे.
जम्मू काश्मीरमधील पुंच्छ सेक्टरमध्ये फत्यापूरचे जवान दीपक घाडगे कार्यरत होते. पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी दुपारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून तेथील भारतीय चौकीवर गोळीबार केला. त्याला भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले. या भारतीय जवानांमध्ये फत्यापूरचे दीपक घाडगे हेही होते. या चकमकीत दीपक घाडगे यांना वीरमरण आले. ते शहीद झाल्याचे वृत्त समजताच फत्यापूरसह परिसरात शोककळा पसरली. शहीद दीपक घाडगे यांचे पार्थिव उद्या संध्याकाळपर्यंत साताऱ्यात पोहोचणार असल्याची माहिती देण्यात आली.
त्यांच्या पश्चात पत्नी निशा, आई शोभा, वडील जगन्नाथ, मुलगा शंभू (वय ४), मुलगी परी (एक वर्ष), विवाहित बहीण असा परिवार आहे. (वार्ताहर)