खिद्रापूर ग्रामसेवकांच्या बदलीसाठी बुधवारपासून उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:02 IST2020-12-05T05:02:01+5:302020-12-05T05:02:01+5:30

कुरुंदवाड : खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील ग्रामसेवक एम. एल. अकिवाटे यांची बदली करावी, या मागणीसाठी बुधवार (दि. ९) ग्रामपंचायतीमोर ...

Fasting from Wednesday for transfer of Khidrapur Gram Sevaks | खिद्रापूर ग्रामसेवकांच्या बदलीसाठी बुधवारपासून उपोषण

खिद्रापूर ग्रामसेवकांच्या बदलीसाठी बुधवारपासून उपोषण

कुरुंदवाड : खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील ग्रामसेवक एम. एल. अकिवाटे यांची बदली करावी, या मागणीसाठी बुधवार (दि. ९) ग्रामपंचायतीमोर बेमुदत उपोषण असल्याचे ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून ग्रामसेवक बदलीचा वाद चिघळला आहे.

ग्रामसेवक अकिवाटे कार्यालयात अनियमित येतात. कामकाजाच्या निर्णय प्रक्रियेत सदस्यांना विश्वासात घेत नाहीत. त्यामुळे त्यांची बदली व्हावी, अशी मागणी सप्टेंबर महिन्यामध्ये केली होती. मात्र, शिरोळ गटविकास अधिकारी यांनी या निवेदनाची दखल न घेतल्याने ऑक्टोबर व नोव्हेंबरमधील ग्रामपंचायतीची मासिक सभेवर सदस्यांनी बहिष्कार टाकला होता.

ग्रामपंचायत सर्व सदस्य व ग्रामस्थांचा ग्रामसेवकाला विरोध असतानाही त्यांची बदली केली जात नसल्याने त्यांची त्वरित बदली व्हावी, यासाठी बुधवारपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर ग्रामपंचायत सदस्यासह शंभरावर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Fasting from Wednesday for transfer of Khidrapur Gram Sevaks