राजे बॅंकेकडुन ग्राहकांना फास्टॅग सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:03 IST2021-02-05T07:03:23+5:302021-02-05T07:03:23+5:30
कागल : येथील राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑपरेटिव्ह बॅंकेने आपल्या ग्राहकांना फास्टॅग सेवा उपलब्ध करुन दिली असून, या उपक्रमाचा शुभारंभ ...

राजे बॅंकेकडुन ग्राहकांना फास्टॅग सेवा
कागल : येथील राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑपरेटिव्ह बॅंकेने आपल्या ग्राहकांना फास्टॅग सेवा उपलब्ध करुन दिली असून, या उपक्रमाचा शुभारंभ बॅंकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी आय. डी. बी. आय. बॅंकेचे शाखा व्यवस्थापक सचिन चौगुले म्हणाले की, आपल्या ग्राहकांना अशी सुविधा देणारी सहकारी बॅंकांमधील राजे बॅंक ही पहिली बॅंक आहे. ग्राहकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी उपाध्यक्ष नंदकुमार माळकर, संचालक आप्पासाहेब भोसले, आप्पासाहेब हुच्चे, राजेंद्र जाधव, विशाल पाटील, प्रकाश पाटील, रणजित पाटील, राजेंद्र घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक चव्हाण यांनी केले तर हरीदास भोसले यांनी आभार मानले.
२८ कागल राजे बँक
फोटो
कागल येथे राजे विक्रमसिंह घाटगे बॅंकेने सुरु केलेल्या फास्टॅग सेवेचा शुभारंभ बॅंकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मान्यवर उपस्थित होते.