शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

Kolhapur: ‘स्वाभिमानी’च्या लढ्यातून शेतकऱ्यांच्या पदरात ९७ कोटी, दोन महिने सुरु होता संघर्ष 

By राजाराम लोंढे | Updated: November 25, 2023 12:06 IST

पुढच्या हंगामातही आंदोलनाची धग

राजाराम लोंढेकोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी सुरू केलेल्या लढ्यातून शेतकऱ्यांच्या पदरात तब्बल ९७ कोटी २६ लाख रुपये पडणार आहेत. दोन महिने शेट्टी यांनी रस्त्यावरचा संघर्ष केला. पण, शेवटपर्यंत काहीतरी पदरात पडल्याशिवाय त्यांनी तलवार म्यान केली नाही. मध्यंतरी विविध कारणांमुळे ‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाला काहीसी मरगळ आली होती. मात्र, यंदा ती झटकली असून, पुढच्या हंगामातही ही धग कायम राहणार हे निश्चित आहे.शेतमालाला दर नसल्याने शेतकरी आर्थिक अरिष्टात आहे. त्यात रासायनिक खते, शेती पंपाच्या वीज दरात केलेली भरमसाठ वाढ आणि शेतमजुरांची वानवा यामुळे दिवसेंदिवस शेती अंगावर येत आहे. अशा परिस्थितीत किमान हमीभाव असलेल्या ऊस पिकाकडे येथील शेतकरी वळला आहे. या पिकातूनही शेतकऱ्यांचा ताळेबंद सुधारला नाही. शेतकऱ्यांच्या दृष्टीने एफआरपी व आरएसपी हे दोन कायदे सुरक्षित असले तरी यंदा साखरेसह इतर उपपदार्थांना चांगला दर मिळत आहे, तर त्यातील नफाही शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, ही भूमिका घेऊन राजू शेट्टी यांनी गेले दोन महिने साखर कारखानदार व राज्य शासनाशी संघर्ष सुरू ठेवला.अखेर, तीन हजार रुपयांपेक्षा कमी दर दिलेल्या कारखान्यांनी मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाला प्रतिटन १००, तर त्यापेक्षा अधिक दर दिलेल्यांनी ५० रुपये देण्यावर एकमत झाले. येत्या दोन महिन्यात साखर आयुक्तांची परवानगी घेऊन हे पैसे शेतकऱ्यांना द्यायचे आहेत. जिल्ह्यातील कारखान्यांनी आतापर्यंत दिलेले पैसे पाहता, अजून ९७ कोटी २६ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. गेले दोन महिने राजू शेट्टी यांनी केलेल्या संघर्षाचे हे फलित म्हणावे लागेल.

चळवळ टिकली पाहिजे..अंतर्गत वादामुळे शेतकरी संघटनांचे तुुकडे पडल्याने शेतकऱ्यांची ताकद विखुरली गेली. पण, सगळ्यांचा उद्देश एकच आहे, त्यातूनच ‘स्वाभिमानी’ने हे मोठे आंदोलन हातात घेतले. त्याला ‘आंदोलन अंकुश’सह इतर संघटनांनी बळ दिले. जय शिवराय संघटनेने कायदेशीर लढाई करत शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली.

‘जवाहर’, ‘दत्त’च्या शेतकऱ्यांना २९ कोटीजवाहर व दत्त कारखान्याला मागील हंगामात गाळपास पाठवलेल्या ऊस उत्पादकांना तब्बल २९ कोटी मिळणार आहेत. त्यापाठोपाठ ‘गुरुदत्त’ला ७.०३ कोटी, तर ‘शरद’ला ६.०५ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.

असे राहिले ‘स्वाभिमानी’चे ऑगस्टपासून आंदोलनाचे टप्पे..

  • साखर आयुक्तांना पत्र
  • प्रत्येक साखर कारखान्याला निवेदन देऊन मागणी
  • प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर धडक मोर्चा
  • साखर कारखान्यांवर ढोल बडाओ आंदोलन
  • ५२२ किलोमीटरची आक्रोश पदयात्रा
  • ऊस परिषद
  • ऊस परिषदेच्या ठिकाणी ऐन दिवाळीत ठिय्या आंदोलन
  • चक्का जाम आंदोलन
  • राष्ट्रीय महामार्ग रोको

कारखानानिहाय अशी द्यावी लागणार रक्कम, कोटीत :आजरा : १.६८भोगावती : २.२९राजाराम : २.०९शाहू : ४.५६दत्त, शिरोळ : ११.४८बिद्री : ४.४०जवाहर : १८.०१हमीदवाडा : २.३०कुंभी : ३.००पंचगंगा (रेणुका शुगर्स) : ४.१३शरद : ६.०५वारणा : ६.७४अथणी (गायकवाड) : ३.७९डी. वाय. पाटील : २.३५दालमिया : ५.०७गुरुदत्त : ७.०३इको केन, चंदगड : १.७३ओलम ग्लोबल, राजगोळी : ३.३१संताजी घोरपडे : ३.४२अथणी (तांबाळे) : १.७२अथर्व (दौलत) : २.०२

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsugarcaneऊसSugar factoryसाखर कारखानेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना