शेतकरी संघ ‘मोहिते-नेसरीकरां’चाच
By Admin | Updated: September 27, 2015 00:38 IST2015-09-27T00:23:12+5:302015-09-27T00:38:21+5:30
बारा विद्यमान संचालक पुन्हा संघात : तीन माजी संचालक पराभूत; विरोधी ‘जय सहकार लोकशाही पॅनेल’ची संस्था गटात कडवी झुंज

शेतकरी संघ ‘मोहिते-नेसरीकरां’चाच
कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना दरमहा ५ किलोप्रमाणे मोफत साखर देण्यात यावी, याबाबतचा महत्त्वपूर्ण ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर झाला. युवा नेते डॉ. अतुल भोसले यांनी मांडलेल्या ठरावाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात मंजुरी दिली. कारखान्याला दोन उपाध्यक्ष असावेत, याबाबतचा ठराव बहुमताने तर कारखान्याच्या गत पाच वर्षातील कारभाराची चौकशी करावी, हा ठराव एकमताने मंजूर झाला.
रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी शांततेत पार पडली. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, युवा नेते डॉ. अतुल भोसले, संचालक धोंडिराम जाधव, जगदीश जगताप, बाजार समितीचे सभापती पैलवान शिवाजीराव जाधव, संचालक हिंदुराव चव्हाण, महादेव देसाई आदींची प्रमुख उपस्थिती होती.
२०१४-१५ चा तत्कालीन संचालक मंडळाने सादर केलेला अहवाल, तसेच ताळेबंद व नफा-तोटा पत्रक मंजूर करण्याचे ठराव तत्कालीन संचालक मंडळावर जबाबदारी ठेवून मंजूर करण्यात आले, तर विषयपत्रिकेवरील इतर विषयही एकमताने मंजूर करण्यात आले. मोफत साखरेच्या ठरावाने सभासदांचे तोंड गोड करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कारखान्याचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने दोन उपाध्यक्ष करण्याचा ठरावही बहुमताने मंजूर करण्यात आला.
वार्षिक सर्वसाधारण सभा उरकल्यानंतर सभासदांना मार्गदर्शन करताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले,र् ‘कारखान्यात सध्या नवीन संचालक मंडळ आपणच पाठविले आहे; परंतु प्रवास एकदम खडतर आहे; पण आम्ही आव्हान स्वीकारलेलं आहे. फक्त एक वर्षाचा अवधी द्या, बिघडलेलं गणित नक्कीच दुरूस्त करून दाखवू.’
खरंतर १९८९ मध्ये जो ‘कृष्णे’त संघर्ष उफाळला, त्यावेळीपासून द्वेषाची बीजे रोवली गेली आहेत. मध्यंतरी ज्यांच्याकडे कारखान्याची सत्ता गेली त्यांनीच संलग्न असणारी ‘कृष्णा’बँक अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. पण आज ‘कृष्णा’ साखर कारखाना अडचणीत असताना त्याच कृष्णा बँकेने मदतीचा हात दिल्याने तोडणी, वाहतुकीचे यंदाचे करार होऊ शकले.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, ‘कृष्णा साखर कारखाना राज्यात सर्वच क्षेत्रात अव्वल असला पाहिजे, ही भूमिका दिवंगत जयवंतराव भोसले यांनी प्रामाणिकपणे जपली; पण विरोधकांनी त्याच्यावर ५२० कोटींचे कर्ज करून ठेवून राज्यातील सर्वात जास्त कर्जात असणारा कारखाना अशी ओळख तयार करून ठेवली आहे. कारखान्याची विस्कटलेली घडी नीट बसविण्यासाठी संचालक मंडळाने स्वत:चे मासिक सभेचे भत्ते न घेण्याचा निर्णय घेतला आहे. सभासदांना बरोबर घेऊन हिताचाच कारभार केला जाईल. (प्रतिनिधी)
पदाच्या आमिषाने एकत्र आलेलो नाही !
कारखान्यात दोन उपाध्यक्ष करावेत, याबाबतचा ठराव सभेपुढे मांडण्यात आल्यानंतर वडगावचे संचालक जगदीश जगताप यांनी माईकचा ताबा घेत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावेळी ते म्हणाले, ‘आम्ही कोणत्याही पदाच्या आमिषाने भोसले गटाच्या बरोबर आलेलो नाही. दबावाचं राजकारण करण्यासाठीही आम्ही एकत्रित आलेलो नाही. हा ठराव माझ्याभोवती फिरतो आहे. म्हणून मी माझे मत व्यक्त करतोय, असेही त्यांनी सांगितले. मात्र याबाबतच्या ठरावाला विरोधी संस्थापक पॅनेलचे संचालक अशोक जगताप यांच्यासह ६० सभासदांच्या लेखी पत्रकाने, तर संचालिका डॉ. उमा अजित देसाई यांच्यासह ३० सभासदांनी लेखी पत्राद्वारे विरोध नोंदविला होता. त्याचे वाचन करून ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.
विरोधी संचालकांची सभेकडे पाठ
कारखान्यात डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलची सत्ता आहे; पण विराधी संस्थापक पॅनेलचे अविनाश मोहितेंसह सहा संचालक निवडून आले आहे. आजच्या या सर्वसाधारण सभेला विरोधक समर्थकांसह उपस्थित राहतील अशी चर्चा होती; पण प्रत्यक्षात विरोधी संचालकांनी सभेकडे पाठ फिरवली. याची सभास्थळी चर्चा होती.
संचालक मंडळाचे कौतुक करा
डॉ. अतुल भोसले यांनी आपल्या भाषणात गत पाच वर्षांतील कारभारावर टीका केली. त्यांनी गलथान कारभार केल्यानेच ५२० कोटींचे कर्ज सध्या कारखान्यावर आहे अन् हे कर्जाचं ओझं विनातक्रार सहकार पॅनेलचे संचालक उचलत आहेत. तेव्हा तुम्ही साऱ्यांनी त्यांचं कौतुक करा अशी टीका केली.