चंदगड तालुक्यात हत्तींच्या वावरामुळे शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 08:37 PM2020-11-18T20:37:48+5:302020-11-18T20:38:56+5:30

wildlife, forestdepartment, kolhapurnews चंदगड तालुक्यात ऐन सुगीत हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. दिवसभर डोंगरात मुक्काम व रात्री शिवारातील पिकांचा मनसोक्त आनंद घेणे असा हत्तींचा दिनक्रम सुरू आहे.

Farmers suffer due to elephant poaching in Chandgad taluka | चंदगड तालुक्यात हत्तींच्या वावरामुळे शेतकरी त्रस्त

चंदगड तालुक्यात हत्तींच्या वावरामुळे शेतकरी त्रस्त

Next
ठळक मुद्देचंदगड तालुक्यात हत्तींच्या वावरामुळे शेतकरी त्रस्त पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

चंदगड :चंदगड तालुक्यात ऐन सुगीत हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. दिवसभर डोंगरात मुक्काम व रात्री शिवारातील पिकांचा मनसोक्त आनंद घेणे असा हत्तींचा दिनक्रम सुरू आहे.

हेरे, पार्ले, मोटणवाडी, वाघोत्रे, इसापूर, कानूर, सडेगूडवळे, पुंद्रा बिजूर आदी गावात हत्तींचा धुमाकूळ सुरू असल्याने ग्रामस्थ वैतागले आहेत. गेले चार दिवस हत्तींचा हेरे परिसरात वावर असून खालसा सावर्डेत हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घालून दहशत निर्माण केली आहे. हत्तींकडून परिसरातील ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुरू आहे. मळणीनंतर रचून ठेवलेले पिंजर व भात पोती उद्धवस्त करीत आहेत.

खालसा सावर्डे व खालसा कोळींद्रे या दोन गावात सध्या हत्तींचा वावर आहे. भात पीक जमीनदोस्त करीत आहेत. येथील लक्ष्मण पाटील, गोविंद नागोजी पाटील, विष्णू जानकू पाटील, पांडुरंग धनाजी पाटील, गंगाराम धनाजी पाटील, शामराव पाटील, पुंडलिक आप्पाजी पाटील, बंडोपंत आप्पाजी पाटील, वैजू पाटील, चंद्रकांत जेलुगडेकर, पांडुरंग पाटील, रामभाऊ पाटील, रामू पाटील, भगिरथी पाटील यांच्या पिकांचे नुकसान केले. साखर कारखानंनी हत्तीबाधित क्षेत्रातील ऊस उचल लवकर करून सहकार्य करावे असे आवाहन खालसा कोळींद्रे सरपंच संजय गावडे यांनी केले आहे.

Web Title: Farmers suffer due to elephant poaching in Chandgad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.