शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शक्तिपीठासाठी सर्व्हे करणाऱ्यांना संतप्त शेतकऱ्यांनी रोखले, महावितरणचे दोन कर्मचारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 16:33 IST

दररोज १७ कि.मी. सर्व्हे

म्हाकवे : संभाव्य शक्तिपीठ महामार्गात अडथळा निर्माण करणारे विजेचे पोल हटविण्याच्या दृष्टीने महावितरणने सर्व्हे सुरू केला आहे. रविवारी खेबवडे (ता. करवीर) येथून व्हनाळी, केनवडेपर्यंत पोलचा सर्व्हे करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना केनवडे येथे शेतकऱ्यांनी पकडून जाब विचारला.

यावेळी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येऊन हा सर्व्हे आपण थांबवत असल्याचे सांगत विषयावर पडदा पाडला. यावेळी शेतकऱ्यांनी या अधिकाऱ्यांनाही धारेवर धरत हा सर्व्हे पूर्णतः बंद करा अन्यथा आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

दरम्यान, केनवडे काही शेतकऱ्यांना दोन कर्मचारी मोबाइल मॅपद्वारे सर्व्हे करत असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता शक्तिपीठ महामार्गात अडथळा ठरणारे खांब किती आहेत, याची माहिती संकलित करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्रीकांत चव्हाण (केनवडे) अमोल डाफळे, प्रकाश पाटील, साताप्पा लोंढे, संतोष पोवार, दादासो पाटील (सिद्धनेर्ली), योगेश कुळूवमोडे(व्हनाळी), आनंदा पाटील यासह केनवडे व्हनाळी, खेबवडे, एकोंडी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.महावितरणचे अधिकारी धारेवरजिल्ह्यात शक्तिपीठ रद्दच्या अधिसूचना असताना सर्व्हे होतोच कसा? सर्व्हे करण्यास तुम्हाला कोणी सांगितले, असा सवाल महावितरणच्या अधिकाऱ्यांना दादासो पाटील (सिद्धनेर्ली) यांनी केला. यावेळी सर्वच शेतकऱ्यांनी या अधिकाऱ्यांना धारेवर धरत प्रश्नांचा भडिमार केला.दररोज १७ कि.मी. सर्व्हेमहावितरणने दोन कर्मचाऱ्यांना या महामार्गाचा ऑनलाइन नकाशा दिला आहे. तसेच त्यांना दररोज १७ कि. मी. अंतराचा सर्व्हे पूर्ण करून माहिती देण्यास सांगितले असल्याचे या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गFarmerशेतकरीmahavitaranमहावितरण