शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी कंपन्या उभाराव्यात

By admin | Updated: October 3, 2015 01:15 IST

राजू शेट्टी यांचे आवाहन : डी. वाय. पाटील कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शन

नवे पारगाव : शेतीच्या उत्पादित मालाचा ग्राहक हा शेतकरी असूनही त्यांची व्यापाऱ्यांकडून लूट होते. यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या पातळीवर शेती माल उत्पादन कंपन्या सुरू कराव्यात, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डी. वाय. पाटील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी अंबप येथे राजेंद्र हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या सभेत खासदार राजू शेट्टी बोलत होते. राजू शेट्टी म्हणाले, डी. वाय. पाटील एज्युकेशनच्या वतीने सुरू असणाऱ्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेती व शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणारे शोध-संशोधन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी भर घालतील असा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले, विभाजन कुटुंब संस्कृतीमुळे शेतीचे तुकडे झाले असल्याने बदलत्या काळाप्रमाणे बदल करून ‘एकत्रित समूह शेती’ पद्धती सुरू करावी. यामुळे उत्पादन खर्च व कष्ट यांची बचत होऊन शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर पडेल. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रा. जयवंत जगताप यांनी स्वागत केले. सरपंच विश्वनाथ पाटील, बाळासाहेब माने शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह माने यांनी मनोगत व्यक्त केले. तळसंदेच्या सीम बायोटेकचे व्यवस्थापक गुलाबराव धुमाळ यांनी ‘केळी पीक व्यवस्थापन’ तर पुण्याच्या नेटाफीम इरिगेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक अरुण देशमुख यांनी आपत्कालीन स्थितीत ऊस शेती मधील ठिबक सिंचन व खत व्यवस्थापन याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी प्रदर्शनातील स्टॉलमधून शेतकऱ्यांनी माहिती घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल जाधव, तालुका कृषी अधिकारी देवकर, अंबपचे उपसरपंच अल्लाबक्ष मुल्ला, माजी सरपंच उषाताई माने, मनपाडळेचे माजी सरपंच राजेंद्र पाटील, अंबपवाडीच्या सरपंच मीनाताई खोत, जिल्हा नियोजन समिती सदस्य वैभव कांबळे, शिवाजी माने, स्वाभिमानीचे विभाग प्रमुख संपतराव पोवार, घुणकीचे माजी उपसरपंच जयसिंग कुरणे, शिवाजी शिंदे, सुधीर मगदूम यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रा. जयवंत जगताप यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सुधि सूर्यगंध यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. दीपक पाटील यांनी आभार मानले.