शेतकऱ्यांनी शेतीतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:25 IST2021-05-07T04:25:03+5:302021-05-07T04:25:03+5:30
शिरोळ : श्री दत्त कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्यप्रकारे मार्गदर्शन करण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांनी आपली वडिलोपार्जित शेती टिकविणे गरजेचे ...

शेतकऱ्यांनी शेतीतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे
शिरोळ : श्री दत्त कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्यप्रकारे मार्गदर्शन करण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांनी आपली वडिलोपार्जित शेती टिकविणे गरजेचे आहे. आठवड्यातून सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतीतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. त्यासाठी दत्त उद्योग समूह सदैव आपल्या पाठीशी आहे, अशी ग्वाही ‘दत्त’चे अध्यक्ष उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी दिली.
धरणगुत्ती (ता. शिरोळ) येथे क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पास सुरुवात उद्यानपंडित पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. ‘दत्त’चे संचालक शेखर पाटील म्हणाले, गावातील सर्व शेतकऱ्यांनी मिळून गावासाठी आवश्यक असणाऱ्या पिकांचे नियोजन करणे गरजेचे आहे. क्षारपड जमिनीमुळे शेतकऱ्यांना उत्पादन घेणे कठीण झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञान, शेतीमधील नवे तंत्र, खतांचा डोस, आदींची माहिती घेऊन शेती करावी. त्याचा उत्पादन वाढीसाठी निश्चित फायदा होईल.
यावेळी मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी राजू मोगलाडे, काकासो पाटील, आप्पासो पाटील, नारायण रजपूत, चंद्रकांत चौगुले, सुरेश आरगे, दत्तात्रय पाटील, जितेंद्रकुमार पाटील, अशोक पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
फोटो - ०६०५२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - धरणगुत्ती (ता. शिरोळ) येथे उद्यानपंडित गणपतराव पाटील यांचा सत्कार शेखर पाटील यांच्या हस्ते झाला.