शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सैनिक टाकळीत पिकात गांजाची लागवड, संशयित शेतकऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 12:09 IST

गांजा पिकाच्या उत्पादनाला बंदी असतानाही शेतकऱ्याने राजरोसपणे या पिकाचे उत्पादन घेतल्याने पोलीसही चक्रावले

कुरुंदवाड : सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील एका शेतकऱ्याने ऊस पिकात आंतरपीक म्हणून चक्क गांजाची लागवड केली आहे. सदाशिव आप्पासाहेब कोळी, असे संशयित आरोपी शेतकऱ्याचे नाव आहे.पोलिसांनी या गांजाच्या शेतात व आरोपी कोळी याच्या घरावर छापा टाकून 490 गांजाची रोपे आणि सुका तयार पाच किलो गांजा, असा लाखो रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या आंतरपिकाच्या शेतीमुळे गावात खळबळ उडाली आहे. संशयित आरोपी कोळी याला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध कुरुंदवाड पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गांजाची शेती करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, सैनिक टाकळी येथील शेतकरी कोळी याने आपल्या उसात (गट नं. 1005) मध्ये चक्क गांजाची लागवड केली आहे. याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यामुळे कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी पोलीस पथकाच्या साहाय्याने गुरुवारी सायंकाळी गांजा शेतीवरच छापा टाकला.

यावेळी ऊस पिकामध्ये दोन ते तीन फूट उंचीची गांजाची रोपे आढळून आली. पोलीस पथकाने शेतात फिरून रोपे उपसली असता 490 रोपे मिळून आली.

त्यानंतर पोलिसांनी कोळी याच्या घरावर छापा टाकला असता पाच किलो तयार गांजा व गांजाच्या पुड्या मिळून आल्या. या प्रकाराने खळबळ उडाली असून, गांजा पिकाच्या उत्पादनाला बंदी असतानाही शेतकऱ्याने राजरोसपणे या पिकाचे उत्पादन घेत असल्याने पोलीसही चक्रावून गेले. तयार झालेला गांजा शेतकरी कर्नाटकात विक्री करत असल्याचे समजते. त्यामुळे गांजाचे रॅकेटही उघडकीस येण्याची शक्यता आहे.

पथकात पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, किशोर खाडे, फारुख जमादार, शहाजी फोंडे, प्रकाश हंकारे, शिरीष कांबळे, सुप्रिया जगदाळे यांचा समावेश होता. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी