शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: अचानक लादलेल्या उपसा बंदी विरोधात शेतकऱ्यांचा यल्गार,  सोनगे वीज कार्यालयावर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 11:49 IST

शिवारातून थेट मोर्चात...

दत्ता पाटीलम्हाकवे : पाटबंधारे विभागाने कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक लादलेल्या तब्बल पाच दिवसाच्या उपसा बंदी विरोधात वेदंगगा काठावरील कुरुकली, सुरुपली, सोनगे, बानगे बस्तवडे परिसरातील शेतकऱ्यांनी सोनगे वीज वितरण कार्यालयावर सकाळी सकाळीच मोर्चा काढून संताप व्यक्त केला. यावेळी पाटबंधारे विभागासह वीज वितरण कंपनीचे अधिकाऱ्यांना घेरावा घालत धारेवर धरले. तसेच, यावेळी मागे घ्या...मागे घ्या..उपसाबंदी आदेश मागे घ्या असा गजर शेतकऱ्यांनी केला.अनेक शेतकऱ्यांच्या ऊसभरणीची कामे सुरू आहेत.तसेच शेतकऱ्यांनी ऊसाला रासायनिक खते टाकली आहेत. त्यामुळे सध्या या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे.माञ, आज शनिवारी सकाळपासून तब्बल पाच दिवसांसाठी उपासाबंदी लागू केल्याने येथील शेतकरी कासावीस झाला आहे.वेदगंगा नदीवर आदमापुर बंधार्यापासून पुर्व भागातील मुरगुड, सुरुपली, यमगे, शिंदेवाडी, कुरुकली, मळगे, भडगाव, कुरणी, बानगे सोनगे, म्हाकवे, आनुर बस्तवडे चिखली, कौलगे यासह अनेक गावातील शेतकऱ्यांच्या पिकांना ऐन उन्हाळ्यात झळा बसणार आहे.दरम्यान, काळम्मावाडी धरणाच्या कराराप्रमाणे कर्नाटकाला देण्यात येणारे पाणी हे नदीतूनच द्यायचे आहे. त्यामुळे सुरुवातीच्या गावात मोठ्या प्रमाणावर असणार्या उपसा यंञामुळे कर्नाटकातील शेतकऱ्यांना पाणीच मिळत नाही. त्यामुळे उपसाबंदीचा निर्णय घ्यावा लागत असून शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केले जात आहे.यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी महेश चव्हाण, राणमाळे, सुनिल पाटील, वीज वितरणचे मेटकर,बाळासाहेब चौगुले, माजी सरपंच बी.आर पाटील, जयवंतराव पाटील, आर.व्ही.पाटील, जयसिंग पाटील-सोनगेकर, पांडुरंग डावरे, बापूसाहेब ढोले, प्रल्हाद पाटील, विलास पाटील, भास्कर पाटील,संजय पाटील यासह शेतकरी उपस्थित होते.

शिवारातून थेट मोर्चात...काही शेतकऱ्यांना उपसा बंदीबाबत माहिती नव्हती त्यामुळे ते नेहमीप्रमाणे सकाळी मोटरपंप सुरू करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना उपसाबंदी बाबत समजताच ते शेतकरी थेट या मोर्चात सहभागी झाले.

गत आठवड्यात दोन दिवस उपसाबंदी केली होती.तरीही पुन्हा पुर्वकल्पना न देता पाच दिवस उपसाबंदी करण्याचा निर्णय चुकीचा असून तो तात्काळ मागे घ्यावा अन्यथा आम्हाला रास्ता रोको आंदोलन करावे लागेल. - जयवंतराव पाटील, कुरुकलीकर प्रशासक, शेतकरी संघ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीelectricityवीज