शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2022: शेतकऱ्यांच्या तोंडाला केवळ पाने पुसली, साखर कारखानदारीचा साधा उल्लेखही नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 13:07 IST

देशातील दोन नंबरचा उद्योग असलेल्या साखर कारखानदारीचा तरी अर्थमंत्र्यांच्या भाषणात साधा उल्लेखही आलेला नाही.

विश्वास पाटीलकोल्हापूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची प्रतिक्रिया कृषी क्षेत्रातून व्यक्त झाली आहे. देशातील दोन नंबरचा उद्योग असलेल्या साखर कारखानदारीचा तरी अर्थमंत्र्यांच्या भाषणात साधा उल्लेखही आलेला नाही.वर्षभराच्या आंदोलनाची दखल घेऊन केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द केले; परंतु त्यातील मुख्य मागणी जी हमीभावाची होती, त्याबद्दल अर्थमंत्री या अर्थसंकल्पात काहीच बोललेल्या नाहीत. हे कायदे मागे घेणे केंद्र सरकारला आवडलेले नाही. त्यामुळे त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसले. - कृषी क्षेत्रासाठी तीन घोषणा केल्या, त्यामध्ये किसान ड्रोन योजना. शेतकऱ्यांनी शेतीवर रासायनिक खते व कीटकनाशके फवारणीसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे सरकारला वाटते. 

- दुसरी घोषणा त्यांनी नैसर्गिक शेतीला बळ देण्याची केली आहे. त्यासाठी ते गंगेच्या खोऱ्यात पाच किलोमीटर खोऱ्यात हा प्रायोगिक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. परंतु गंमत अशी की एक योजना ड्रोनद्वारे खते द्या म्हणून सांगते व दुसरी नैसर्गिक शेती करा म्हणून. 

- शेतकऱ्यांना डिजिटल करण्याचा सरकारचा मनसुभा आहे. त्याला डिजिटल करणे म्हणजे हे काम करणाऱ्या कंपन्यांना रोजगार मिळवून देण्याचाच प्रकार आहे. त्यातून शेतकऱ्याचा त्रास कमी होईल असा आजपर्यंतचा अनुभव नाही. 

- महाराष्ट्रातील जमीनधारणा विचारात घेता या शेतकऱ्यांना नैसर्गिक किंवा रसायनमुक्त शेती करणे शक्य नाही. त्यासाठीची भांडवल गुंतवणूक करण्याची त्याची क्षमता नाही. आणि सरकार मात्र नैसर्गिक शेती करा म्हणून त्याला पळवत आहे.

साखरेची खरेदी किंमत ३५ करण्याकडे दुर्लक्षसाखरेची किमान खरेदी किंमत ३१ वरून ३५ करावी, अशी देशातील साखर उद्योगाची मागणी होती. यापूर्वी एफआरपी देण्यासाठी घेतलेल्या कर्जांची पुनर्रचना करण्याची मागणी होती; परंतु त्याकडेही केंद्र सरकारने ढुंकून पाहिलेले नाही. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBudgetअर्थसंकल्प 2022agricultureशेतीSugar factoryसाखर कारखाने