शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी 'ठिबक सिंचन'च्या अनुदानापासून कोरडे, 'ही' अट ठरतंय मारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 14:06 IST

तब्बल चार लाखांवर शेतकरी योजनेपासून कोरडे

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून तुषार आणि ठिबक सिंचनसाठी अनुदान मिळण्यासाठी कमीत कमी २० गुंठे शेतीची अट असल्याने जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांना पाटानेच पाणी द्यावे लागत आहे. या अटीमुळे तब्बल चार लाखांवर शेतकरी योजनेपासून कोरडे राहिले आहेत. परिणामी या अत्यल्प भू-धारकांसाठी सामूहिक शेती उपसा सिंचन योजनेद्वारे अनुदानाचा लाभ मिळावा, अशी मागणी होत आहे.शासनाच्या कृषी विभागाकडील योजनेतून सध्या ठिबक, तुषार सिंचनसाठी ७० टक्क्यांपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त एकरी २५ ते ३० हजारांपर्यंत अनुदान मिळते. यासाठी २० गुंठ्यांपेक्षा अधिक जमीन असणे बंधनकारक आहे. यातून प्रत्येक वर्षी एक हजार ते १५०० शेतकरी अनुदानाचा लाभ मिळवतात. पण दिवसेंदिवस जमिनीचे तुकडे जास्त पडत असल्याने अत्यल्प भू-धारकांची संख्या वाढते आहे. यामुळे २० गुंठ्याच्या आतील शेतकरी ठिबक, तुषार सिंचनसाठीच्या अनुदानापासून दूर राहत आहेत. परिणामी याचा आर्थिक फटका गरीब, सामान्य शेतकऱ्यांना बसत आहे. जिल्ह्यातील सरासरी जमीनधारणा मुळातच कमी आहे. त्यातही भाऊहिस्से झाल्याने प्रत्येकाच्या वाट्याला कमी जमीन येत आहे. जमीन कमी म्हणून लाभ नाही असा अनुभव त्याला येत आहे.७० टक्के शेतकरी अपात्रजिल्ह्यात एकूण ६ लाख ६० हजार ६७६ शेतकरी आहेत. यापैकी ७० टक्के शेतकरी २० गुंठ्यांपेक्षा कमी जमीन असलेले आहेत. हे सर्व शेतकरी ठिबक, तुषार सिंचनसाठीच्या अनुदान योजनेत अपात्र आहेत. ही संख्या मोठी आहे. म्हणून सामूहिक उपसा सिंचन योजना राबवावी, यासाठी लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे.

आकडे बोलतात

  • २० गुंठ्याच्या आतील शेतकरी : ४ लाख
  • शून्य ते एक हेक्टरपर्यंत जमीन असणारे शेतकरी : ५ लाख ४ हजार ११७
  • एक ते दोन हेक्टरपर्यंत जमीन असणारे शेतकरी : १ लाख ५ हजार ४९२
  • दोन हेक्टरपेक्षा अधिक जमीन असणारे शेतकरी : ५१ हजार ६७

कृषी विभागाकडील योजनेतून तुषार, ठिबक सिंचनसाठी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी २० गुंठे जमीन असावी, अशी अट आहे. पात्र शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळतो. - जालंदर पांगरे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी