शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

भाताच्या ‘संशोधित’ वाणालाच शेतकऱ्यांची पसंती : बियाण्यांचे दर स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 1:19 AM

कोल्हापूर : धूळवाफ पेरणीस सुरुवात झाल्याने भाताच्या बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे.

ठळक मुद्देप्रतिकिलो २० रुपयांचे अनुदान; ७६ हजार टन खत उपलब्ध

कोल्हापूर : धूळवाफ पेरणीस सुरुवात झाल्याने भाताच्या बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. बाजारात विविध वाणांच्या बियाण्यांची रेलचेल दिसत असली तरी यंदा ‘संशोधित’ वाणालाच शेतकऱ्यांची अधिक पसंती दिसत आहे. विशेषत: भातामध्ये पारंपरिक वाणाला नापसंती दाखवीत ‘संशोधित’, ‘अवनि’, ‘पूनम’, ‘तृप्ती’, आदी सुधारित वाणांची खरेदी करताना दिसत आहेत.

जिल्ह्यात खरीप पेरणीत अन्नधान्याचे १ लाख ४८ हजार हेक्टरवर सर्वाधिक क्षेत्र आहे. अन्नधान्यामध्ये भात व नागलीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. भात बियाण्यांची सहज उपलब्धता पाहता पूर्वी पारंपरिक वाणांचा वापर करण्याकडे शेतकºयांचा कल होता; पण उत्पादकता व बाजारातील दर पाहता, सुधारित बियाणे वापराकडे शेतकरी वळले आहेत. पारंपरिक बियाण्याची उत्पादकता कमी असल्याने ‘संशोधित’ वाण वापरले जात आहे. यंदा ‘अवनि’, ‘पूनम’, ‘तृप्ती’, ‘शुभांगी’, ‘वायएसआर’ यांचा वापर वाढल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. त्यांद्वारे उत्पादन जास्त मिळतेच; पण ते खाण्यासाठी चांगले असल्याने शेतकरी या वाणांकडे वळला आहे.

‘महाबीज’कडून बियाण्यांची उपलब्धता स्थानिक विक्रेत्याकडे केली आहे. भात, भुईमूग, सोयाबीन, तूर, उडदाच्या सर्वच वाणांवर प्रतिकिलो २० रुपये अनुदान दिले जाते. शेतकºयांनी ‘महाबीज’चे बियाणे खरेदी करताना सात-बारा, आधार कार्ड, फोन क्रमांक विक्रेत्यांना दिल्यानंतर अनुदान वजा करून पैसे द्यायचे आहेत. सोयाबीन १४ हजार क्विंटल, भात १८ हजार २७१ क्विंटल, ज्वारी ४१३ क्विंटल, भूईमूग २४०० क्विंटल यांसह इतर अशी ३५ हजार क्विंटल बियाण्यांची गरज आहे. त्यांपैकी २२ हजार ९५८ क्विंटल बियाणे ‘महाबीज’कडून उपलब्ध झाले आहे.

यंदा खतांच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे. या हंगामासाठी १ लाख ९१ हजार टन रासायनिक खतांची मागणी होती; त्यापैकी १ लाख ४३ हजार टनाला मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी एप्रिल अखेर ७७ हजार टन खते उपलब्ध झाली आहेत.घरच्या बियाण्यांचे प्रमाण घटले : घरचे बियाणे काढण्याच्या आपल्याकडील पद्धतीमुळे उत्पादकतेवर परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे घरच्या बियाण्यांचे प्रमाण कमी होत चालले असून, भात ४३ टक्के, सोयाबीन ३४ टक्के, तुरीसह इतर कडधान्ये ४२ टक्के, तर भुईमूग ३ टक्के घरातील बियाणे वापरले जाते.कृषी विभाग सज्जकृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामासाठी पुरेशा बियाणे, खतांची उपलब्धता करून ठेवली आहे.शेतकºयांना सहज बियाणे व खते उपलब्ध करून देण्याबाबत स्थानिक पातळीवरील विक्रेत्यांना सूचना केल्या आहेत. 

खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज असून, बियाणे व खतांची पुरेशी उपलब्धता आहे. शेतकºयांनी दर्जेदार बियाण्यांची निवड करावी, उगवण क्षमता तपासूनच घरातील बियाण्यांचा वापर करावा.- चंद्रकांत सूर्यवंशी (कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद)वळवाचा पाऊस चांगला झाल्याने धूळवाफ पेरणीसाठी शेतकºयांची धांदल उडाली आहे. यंदा उसाचे क्षेत्र जास्त असल्याने खरिपाची पेरणी थोडी कमी होईल, असा अंदाज असून, पारंपरिकपेक्षा सुधारित बियाण्यांना शेतकऱ्यांची पसंती आहे.- नितीन जंगम (बियाणे, खत विक्रेते)

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर