शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: हलसवडे येथे जमिनीच्या वादातून शेतकऱ्याचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 16:35 IST

कसबा सांगाव : हलसवडे (ता. करवीर) येथे जमिनीच्या वादातून केलेल्या सशस्त्र हल्ल्यात श्रीमंत पांडुरंग कांबळे (वय ५१, रा. हलसवडे, ...

कसबा सांगाव : हलसवडे (ता. करवीर) येथे जमिनीच्या वादातून केलेल्या सशस्त्र हल्ल्यात श्रीमंत पांडुरंग कांबळे (वय ५१, रा. हलसवडे, ता. करवीर) यांचा मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा ऋतुराज श्रीमंत कांबळे (वय १८) व विनोद देसाई हे गंभीर जखमी झाले.याबाबत जखमी ऋतुराज कांबळे याने दशरथ रुद्राप्पा कांबळे, मोहन दशरथ कांबळे, रघुनाथ दशरथ कांबळे, वैभव नामदेव कांबळे, साहील रघुनाथ कांबळे (सर्व रा. हलसवडे) या पाच जणांविरोधात गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, श्रीमंत कांबळे व आरोपी दशरथ कांबळे यांच्यात हलसवडे येथील शेतजमीन गट क्र. ५२७ मधील वाटणीवरून वाद सुरू आहे. दशरथ कांबळे याने शनिवारी रात्री श्रीमंत कांबळे यांच्या दारात जमाव करून हल्ला केला.मोहन याने ऋतुराज याच्या पोटावर चाकूने वार केला तर विनोद देसाई याच्यावर रघुनाथ कांबळे याने कुऱ्हाडीने हल्ला केला. यावेळी श्रीमंत कांबळे यांच्या छातीवर वैभव कांबळे याने चाकूने गंभीर वार केला. त्याचवेळेस रघुनाथ व साहील यांनी श्रीमंत कांबळेंच्या पाठीवर व खांद्यावर वार केले. यामध्ये त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. अधिक तपास स. पो. नि. डी. एम. गायकवाड करत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस