धामोड येथील शेतकऱ्याचा बांधावरून पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:26 IST2021-04-02T04:26:00+5:302021-04-02T04:26:00+5:30

धामोड : धामोड तालुका राधानगरी येथील मारुती बापू डबे (वय ७५ ) यांचा बांधावरून पडून मृत्यू झाला. मारुती डबे ...

A farmer from Dhamod died after falling from a dam | धामोड येथील शेतकऱ्याचा बांधावरून पडून मृत्यू

धामोड येथील शेतकऱ्याचा बांधावरून पडून मृत्यू

धामोड : धामोड तालुका राधानगरी येथील मारुती बापू डबे (वय ७५ ) यांचा बांधावरून पडून मृत्यू झाला. मारुती डबे हे घरातून तीन दिवसांपूर्वी काही न सांगता निघून गेल्याने व आज अचानक त्याचा मृतदेह मिळाल्याने मृत्यूविषयी संशय व्यक्त केला जात आहे. रात्री उशिरा शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले.

मारुती बापू डबे हे मंगळवारी काही न सांगता अचानक घरातून निघून गेले होते. मुलगा संदिप याने इतरत्र चौकशी केली पण त्यांचा शोध लागला नाही. त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडल्याने ते इतरत्र कोठे तरी असतील व घरी परततील असा अंदाज बाधून घराच्या मंडळीनी शोध कार्य थांबवले. आज सकाळी धामोडपासून आठ ते दहा किलोमीटर लांब अंतरावर असलेल्या पिलारवाडी येथील जंगलाशेजारील शेतामध्ये त्यांचा मृतदेह आढळला. संबंधित घटनेची वर्दी धामोडचे पोलीस पाटील महादेव फडके यांनी राधाने पोलिसांना दिली.

नेहमी गाव,स्वतःचे शेतामध्ये फेरफटका मारणाऱ्या आपल्या वडिलांचा मृतदेह पिलारवाडी सारख्या डोंगराळ भागातील गावाच्या शिवारामध्ये आढळून आल्याने मुलगाने त्यांच्या मृत्यू बद्दल शंका व्यक्त करत शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला. रात्री उशिरा शवविच्छेदकेरून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक उदय डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कुंभार करत आहेत.

Web Title: A farmer from Dhamod died after falling from a dam