शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

फार्म हाऊसवर वेश्या व्यवसाय, तीन महिलांची केली सुटका; कोल्हापूर पोलिसांनी म्हाळुंगेत मध्यरात्री टाकला छापा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 17:37 IST

पोलिसांनी यापूर्वी याठिकाणी दोन वेळा छापा टाकला होता

नितीन भगवानपन्हाळा: पन्हाळ्याच्या पायथ्याशी मसाई पठारकडे जाताना म्हाळुंगे गावातील एका फार्म हाऊसवर कोल्हापूरपोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकला. यावेळी वेश्याव्यवसाय करण्यासाठी आणलेल्या तीन महिलांची सुटका करत फार्म हाऊसच्या चालकासह तिघांना ताब्यात घेतले.फार्म हाऊस चालक सुरज विश्वास वरेकर (रा.म्हाळुंगे), प्रसाद आनंदा वरेकर (म्हाळुंगे) आणि रविंद्र पांडुरंग कर्ले (रा.वडणगे) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. तर ताब्यात घेतलेल्या संबंधित महिलांना सुधारगृहात पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मिळालेल्या माहिती नुसार, म्हाळुंगे गावातील एका फार्म हाऊसवर वेश्याव्यवसाय सुरु असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. फार्म हाऊस चालक सुरज विश्वास वरेकर हा मध्यस्थी रविंद्र पांडुरंग कर्ले (रा.वडणगे) याचे मार्फत काही महिलांना याठिकाणी वेश्याव्यवसायासाठी आणत होता. यामाहितीवरुन पोलिसांनी यापूर्वी याठिकाणी दोन वेळा छापा टाकला होता. मात्र कारवाईदरम्यान काहीच आढळून आले नव्हते.दरम्यान, आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास कोल्हापूर पोलीस विभागातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे आनंदराव सोपान पाटील यांच्यासह पथकाने याठिकाणी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी तीन महिला आढळून आल्या. पोलिसांनी या तीन महिलांसह रविंद्र कर्ले, सुरज वरेकर, प्रसाद वरेकर या तिघांना अटक केली. तर महिलांना सुधारगृहात पाठवल्याचे पन्हाळा पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी सांगितले. आरोपी कडून मोबाईल फोन व एक जुनी मारुती गाडी सह रोख रक्कम मिळुन १ लाख ६७ हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.   

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस